​ विद्या बालनने धुडकावल्या डझनभर बायोपिकच्या आॅफर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 16:51 IST2017-01-31T11:21:28+5:302017-01-31T16:51:28+5:30

बॉलिवूडच्या कुठल्याही अभिनेत्याला वा अभिनेत्रीला १२ बायोपिकसाठी विचारणा झालीच तर तो यापैकी किमान एक प्रस्ताव तरी स्विकारेल. पण बॉलिवूडची ...

Dozens of biopic aborted by Vidya Balan! | ​ विद्या बालनने धुडकावल्या डझनभर बायोपिकच्या आॅफर्स!

​ विद्या बालनने धुडकावल्या डझनभर बायोपिकच्या आॅफर्स!

लिवूडच्या कुठल्याही अभिनेत्याला वा अभिनेत्रीला १२ बायोपिकसाठी विचारणा झालीच तर तो यापैकी किमान एक प्रस्ताव तरी स्विकारेल. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री मात्र इतकी सिलेक्टिव आहे की, तिने १२ ही बायोपिकचे प्रस्ताव सरसकट धुडकावून लावलेत. होय, ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर विद्या बालन आहे.

‘डर्टी पिक्चर’नंतर विद्याला तब्बल १२ बायोपिक रोल आॅफर केले गेलेत. पण विद्याने यापैकी एकालाही होकार दिला नाही. कारण काय, तर तिला यापैकी एकाही बायोपिकमधील भूमिका दमदार वाटली नाही. विद्याला बायोपिक करण्यात रस आहे. पण तिच्यामते, भूमिका तेवढी दमदार असायला हवी. मध्यंतरी विद्याने इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. राजकारणावर आधारित एखादा चित्रपट करण्याची तुझी इच्छा आहे का? असा प्रश्न विद्याला विचारला गेला होता. यावर  विद्याने होकारार्थी उत्तर दिले होते. मला इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल. कारण इंदिरा गांधीसारख्या महिला नेत्याची भूमिका साकारणे आपल्यातच एक गौरवास्पद बाब आहे. याशिवाय अभिनेत्री मीना कुमारी हिची भूमिका करायलाही मला आवडेल, असे विद्या म्हणाली होती.

काही दिवसांपूर्वीच विद्या ही केरळच्या दिवंगत कवयित्री कमला दास ऊर्फ कमला सुरैया यांच्यावर आधारित बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार, अशी चर्चा होती.  या चित्रपटासाठी विद्याने कमला दास यांच्या आत्मचरित्राचे वाचनही केले होते. पण चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्यानंतर दुस-याच दिवशी तिने हा चित्रपट कोणतेही कारण न देता सोडून दिला.  

ALSO READ : ​विद्या बालनची जागा घेणार ही अभिनेत्री?
‘या’ कारणामुळे कमला दास बनण्यास विद्याने दिला नकार?

अलीकडे विद्याचा ‘कहानी2’ हा सिनेमा येऊन गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. ‘कहानी2’नंतर विद्या ‘तुम्हारी सुल्लू’ या चित्रपटात दिसणार आहे. विद्याने नुकतीच या चित्रपटाची शूटींग सुरु केली. यात विद्या रेडिओ जॅकीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Dozens of biopic aborted by Vidya Balan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.