जावयाच्या खेळाने सासऱ्याची छाती फुगली; पाकिस्तानला धूळ चारल्याचा डबल आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 01:53 PM2023-09-12T13:53:56+5:302023-09-12T14:17:24+5:30

भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील सामना सोमवारी अखेर सुरू झाला.

Double joy for Bharat Vijay Sunil Shetty, father-in-law's special post for son-in-law | जावयाच्या खेळाने सासऱ्याची छाती फुगली; पाकिस्तानला धूळ चारल्याचा डबल आनंद

जावयाच्या खेळाने सासऱ्याची छाती फुगली; पाकिस्तानला धूळ चारल्याचा डबल आनंद

googlenewsNext

मुंबई - जावयाचं नाव झाल्यावर सासू-सासऱ्यांना आनंद होतच असतो. त्याला सेलिब्रिटीही अपवाद नसतात. गेल्या काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडचा अण्णा म्हणजे सुनिल शेट्टीच्या कन्येचा विवाह टीम इंडियाचा फलंदाज लोकेश राहुल याच्यासोबत झाला. त्यानंतर, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात सुनिल शेट्टीच्या जावयाने पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. विशेष म्हणजे राहुलने शानदार शतकही झळकावले. त्यामुळे, भारताच्या विजयाचा डबल आनंद सुनिल शेट्टीला झाला आहे. 

भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील सामना सोमवारी अखेर सुरू झाला. रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीनंतर पावसाची एन्ट्री झाली होती. पण, लोकेश राहुल ( KL Rahul) व विराट कोहली यांची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी करत शतकंही झळकावली. लोकेशने शादाब खानला चांगलेच धुतले. पुढे येऊन त्याने मनगटाच्या जोरावर मारलेला षटकार अप्रतिम होता. लोकेशने १०० चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे १०६ चेंडूत २ षटकार आणि १२ चौकारांसह तो १११ धावांवर नाबाद राहिला. 

भारताने पाकिस्तानला धूळ चारल्याचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. एकीकडे भारताने पाकिस्ताचा धुव्वा उडवल्याचा आनंद, तर दुसरीकडे त्याच सामन्यात आपल्या जावयाने शतक ठोकल्याचा अत्यानंद अभिनेता सुनिल शेट्टीला झाल्याचं पाहायला मिळालं. 


सुनिल शेट्टीने जावयासाठी खास पोस्ट इंस्टाग्रामवरुन लिहिली आहे, तसेच या कामगिरीबद्दल देवाचेही आभार मानले आहेत. 'एक उदात्त कामगिरी, एक विजयी पुनरागमन, खूप कृतज्ञता, सर्व प्रयत्नांना सक्षम बनवल्याबद्दल सर्वशक्तिमान देवाचे आभार.' सुनीलने केलेल्या पोस्टवर केएलनेही हार्ट इमोजी पोस्ट करत त्याच्या या कौतुकाबद्दल आभार मानले आहेत. सुनीलने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराटच्या शतकी खेळीचेही कौतुक केले आहे. 

दरम्यान, उत्तुंग फटक्यांसोबतच विराट-लोकेश २-२ धावाही चतुराईने चोरत होते. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज हतबल झाले. हॅरीसच्या गैरहजेरीमुळे इफ्तिखारने ५ षटकं टाकली अन् भारताने ४६ धावा कुटल्या. सेट झालेल्या या दोघांनी अखेरच्या षटकांत स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. 

Web Title: Double joy for Bharat Vijay Sunil Shetty, father-in-law's special post for son-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.