Dont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:35 IST2018-11-16T13:33:03+5:302018-11-16T13:35:05+5:30
वरुण धवन ‘कलंक’ या आपल्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी सध्या तो जिममध्ये बराच घाम गाळताना दिसतोय. नुकताच वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर एक क्रेजी व्हिडिओ शेअर केला.

Dont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात?
वरुण धवन ‘कलंक’ या आपल्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी सध्या तो जिममध्ये बराच घाम गाळताना दिसतोय. नुकताच वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर एक क्रेजी व्हिडिओ शेअर केला. यात तो धावत्या ट्रेडमिलवर डंबल ठेवून एक्सरसाईज करताना दिसतोय. साहजिकचं त्याची ही एक्सरसाईज जीवावर बेतणारी होती. कारण, थोडीही चूक झाली असती तरी गंभीर इजा झाली असती. पण वरूणने ही एक्सरसाईज अगदी सहजपणे पूर्ण केली. साहजिकचं त्याचा हा क्रेजी हा व्हिडिओ पाहून चाहतेही क्रेजी झालेत. पण वरुणने आपल्या चाहत्यांना हे घरी ट्राय न करण्याचा सल्ला दिला.
तुम्हीही पाहा तर पण Dont Try This At Home...
यावर्षांत वरूणचे दोन चित्रपट रिलीज झालेत. एक म्हणजे ‘अक्टूबर’ आणि दुसरा म्हणजे ‘सुईधागा’. यानंतर वरुण ‘कलंक’ घेऊन येतोय. या चित्रपटात वरुण व आलियाची हीच जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. पुढीलवर्षी १९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय.
‘कलंक’ या चित्रपटाच्या तयारीसोबतचं वरुणने लग्नाची तयारीही चालवली आहे. गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत वरूण लवकरचं लग्न करणार आहे. अलीकडे नताशा ही माझी मैत्रिण नसून होणारी बायको आहे, असे वरुणने जाहिर केले होते.