Doctor G : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, आयुषमान खुरानाच्या 'डॉक्टर जी'चा दमदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 04:43 PM2022-09-20T16:43:07+5:302022-09-20T16:43:46+5:30

अभिनेता आयुषमान खुराना(Ayushman Khurana)चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'डॉक्टर जी' (Doctor G)चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Doctor G: The fans' wait is finally over! Ayushmann Khurrana's 'Doctor G' trailer release | Doctor G : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, आयुषमान खुरानाच्या 'डॉक्टर जी'चा दमदार ट्रेलर रिलीज

Doctor G : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, आयुषमान खुरानाच्या 'डॉक्टर जी'चा दमदार ट्रेलर रिलीज

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना(Ayushman Khurana)चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'डॉक्टर जी' (Doctor G)चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आयुषमान चित्रपटात गायनॅकोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि शेफाली शाह(Shefali Shah)देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

आयुषमान खुराना नेहमी एकापेक्षा एक हटके भूमिका रुपेरी पडद्यावर साकारताना दिसतो. पुन्हा एकदा तो हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी तो  डॉक्टर जी चित्रपटात स्त्रीरोग तज्ज्ञ उद्य गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूप दमदार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कसे महिला पुरुष डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी संकोच करतात. डॉक्टर जीमध्ये आयुषमान शिवाय शेफाली शाह मेडिकल प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंगदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


सामाजिक मुदद्यावर आधारीत डॉक्टर जी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. सोशल मीडियावर चाहते ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, आमच्या सुपरस्टारचा आणखी एक दमदार चित्रपट. आणखी एका युजरने म्हटले की, हा चित्रपट पाहण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. 
आयुषमान खुराना डॉक्टर जी चित्रपटाच्या आधी अनेक चित्रपटात पाहायला मिळाला होता. अनुभव सिन्हाचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाने फक्त ८.१५ कोटींचा बिझनेस केला होता.

Web Title: Doctor G: The fans' wait is finally over! Ayushmann Khurrana's 'Doctor G' trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.