​ ‘ट्युबलाईट’चे ‘डबल खान’ पोस्टर तुम्ही पाहिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 15:44 IST2017-04-30T10:11:24+5:302017-04-30T15:44:03+5:30

सध्या सगळीकडे ‘बाहुबली2’चा बोलबाला आहे. पण अशातही लाईमलाईटमध्ये राहणे सलमान खानला चांगलेच जमले म्हणायचे. होय, सलमानचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाईट’चे ...

Do you see 'Tubublight' double-mine poster? | ​ ‘ट्युबलाईट’चे ‘डबल खान’ पोस्टर तुम्ही पाहिले?

​ ‘ट्युबलाईट’चे ‘डबल खान’ पोस्टर तुम्ही पाहिले?

्या सगळीकडे ‘बाहुबली2’चा बोलबाला आहे. पण अशातही लाईमलाईटमध्ये राहणे सलमान खानला चांगलेच जमले म्हणायचे. होय, सलमानचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाईट’चे टीजर येत्या चार दिवसांत येणार आहे. यापूर्वी चर्चा तर व्हायलाच हवी ना? होय,  ‘ट्युबलाईट’चे एक नवे पोस्टर आऊट झाले आहे. चित्रपटाचे पहिले ‘डबल खान’ पोस्टर पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. ‘ट्युबलाईट’चे एक पोस्टर आधीच लीक झाले आहे. आता चित्रपटाचे एक नवे पोस्टर जारी करण्यात आले आहे. यात सलमान खान व सोहेल खान हे दोघेही दिसत आहेत. हे पोस्टर पाहिल्यानंतर ‘ट्युबलाईट’चा टीजर पाहण्याची तुमची उत्सुकता वाढणार नाही तर नवल.



सलमान खान व सोहेल खान या दोन रिअल लाईफ ब्रदर्सची जोडी यापूर्वीही मोठ्या पडद्यावर दिसली आहे. ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘ मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज खन्ना’ आणि ‘वीर’मध्ये सलमान व सोहेलने एकत्र काम केलेय.
‘ट्युबलाईट’च्या टीजरबद्दल म्हणाल तर सलमान आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान या दोघांमध्ये यावरून थोडे मतभेद निर्माण झाले आहेत. कबीर खानला टीजरमध्ये शाहरूख खान नको आहे. तर सलमानला तो हवा आहे. टीजरमध्ये शाहरूखला पाहून प्रेक्षक एक्ससाईटेड होतील, असे सलमानचे मत आहे. आता इथे शाहरूख कुठून आला, हे विचारू नका. अहो, शाहरूखने या चित्रपटात कॅमिओ केला आहे. शाहरूखचा ‘ट्युबलाईट’मधील कॅमिओ या वर्षातील सगळ्यात चर्चित कॅमिओ आहे. यात शाहरूख एक जादूगाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चेहºयावर एक टॅटू असणार आहे. आता या टॅटूमागे कारण तर असणारच. आता ते तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार!
 

Web Title: Do you see 'Tubublight' double-mine poster?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.