रणवीर सिंग आणि अक्षय कुमारचा ‘ब्रोमान्स’ तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 11:53 IST2017-02-07T06:23:59+5:302017-02-07T11:53:59+5:30

रणवीर सिंग तर त्याच्या एनर्जीसाठी प्रसिद्ध आहे. तो जेथे जातो तेथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण एका कार्यक्रमात त्याला तोडीसतोड ...

Do you see Ranvir Singh and Akshay Kumar's 'Bromons'? | रणवीर सिंग आणि अक्षय कुमारचा ‘ब्रोमान्स’ तुम्ही पाहिलात का?

रणवीर सिंग आणि अक्षय कुमारचा ‘ब्रोमान्स’ तुम्ही पाहिलात का?

वीर सिंग तर त्याच्या एनर्जीसाठी प्रसिद्ध आहे. तो जेथे जातो तेथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण एका कार्यक्रमात त्याला तोडीसतोड टक्कर देणारा कलाकारा भेटला. तो म्हणजे ‘खिलाडी’ अक्षय कुमार.

हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात या दोघांनी मिळून धमाल केली. त्यांच्या ब्रोमान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

स्टेजवर अक्षय आणि रणवीरने सगळ्यांसमोर ‘हुक्काबार’ हे लोकप्रिय गायले. ‘खिलाडी ७८६’ चित्रपटातील हे गाणे पार्टी नंबर म्हणून सुपरहीट आहे. त्यामुळे स्वत: खिलाडी उपस्थित असल्यावर त्याच्याच तोंडून हे गाणे लाईव्ह ऐकण्याची संधी तशी दुर्मिळच. म्हणून तर या दोघांचा हा ‘हुक्काबार’ ब्रोमान्स व्हिडिओ नेटिझन्समध्ये व्हायरल झाला आहे.

तुम्ही आधी हा व्हिडिओ पाहा...
 
व्हाट्टे परफॉर्मन्स गाईज...

या दोघांची अशी स्पोर्टिंग केमिस्ट्री पाहून एखाद्या चित्रपटात या दोघांनी काम करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटते? नक्कीच करायला पाहिजे.

केशव रेड्डी या धनाढ्य व्यवसायिकाच्या लग्नात अक्षय, रणवीरसोबतच जॅकलिन फर्नांडिज आणि शिल्पा शेट्टीदेखील उपस्थित होत्या. सध्या ‘पद्मावती’ चित्रपटाची शूटींग करीत असलेला रणवीर अल्लाउद्दीन खिलजीच्या लूकमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता. या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तिकडे अक्षय कुमार येत्या शुक्रवारी ‘जॉली एलएलबी २’मध्ये दिसणार आहे. सध्या अनेक वकिल संघटनांनी या चित्रपटाविरोधात तक्रारी केल्या आहेत की, या सिनेमात वकिलांची प्रतिमा अत्यंत अपमानास्पदकरीत्या दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे कोर्टाने चित्रपटातील चार दृश्ये कापण्याचा आदेश दिला. या सिनेमाबरोबरच अक्षय यावर्षी ‘नाम शबाना’, ‘रजनीकांत २.०’ आणि ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या चित्रपटांतही दिसणार आहे.

Web Title: Do you see Ranvir Singh and Akshay Kumar's 'Bromons'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.