हाफ जॅकेट अन् फंकी बेल्टमधील इमरान हाश्मीचा लुक तुम्ही बघितला काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 22:04 IST2017-07-06T16:34:18+5:302017-07-06T22:04:54+5:30

काही दिवसांपूर्वीच मल्टी स्टारर ‘बादशाहो’ या चित्रपटाचे टीजर रिलीज करण्यात आले होते. लोकांना हे टीजर प्रचंड आवडले असून, सध्या ...

Do you see Imran Hashmi's look in Half Jacket and Funky belt? | हाफ जॅकेट अन् फंकी बेल्टमधील इमरान हाश्मीचा लुक तुम्ही बघितला काय?

हाफ जॅकेट अन् फंकी बेल्टमधील इमरान हाश्मीचा लुक तुम्ही बघितला काय?

ही दिवसांपूर्वीच मल्टी स्टारर ‘बादशाहो’ या चित्रपटाचे टीजर रिलीज करण्यात आले होते. लोकांना हे टीजर प्रचंड आवडले असून, सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. या चित्रपटात अजय देवगण, इमरान हाश्मी, विद्युत जामवाल, इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. चित्रपटाचा टीजर रिलीज करण्याअगोदर चित्रपटातील सर्वच कलाकरांचे लुक रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी दोन फोटोज समोर आले असून, यामध्ये इमरान हाश्मीचा अंदाज बघण्यासारखा आहे. 

हे फोटो चित्रपटाच्या आॅफिशियल ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये इमरान अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळत आहे. पहिल्या फोटोत इमरान हाफ जॅकेटमध्ये दिसत असून, या फोटोचे एक वैशिष्ट्य म्हणजे इमरानने घातलेला बेल्ट आहे. ज्याच्या बकलचा शेफ अगदी ‘दिल’च्या आकाराचा आहे. शिवाय इमरानच्या हातात लेदरचे बरेचसे ब्रेसलेट आहेत. दोन्ही हातांवर टॅटूही दिसत आहेत. तर दुसºया फोटोमध्ये इमरान हातात बंदूक घेऊन दिसत आहे. शिवाय त्याच्या हातावर बंदूकचा एक टॅटूही आहे. इमरानच्या या फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, ती म्हणजे चित्रपटात त्याचा अंदाज खूपच रंगीन असा आहे. }}}} ">.@emraanhashmi the street smart Rajasthani flaunts his style in sleeveless jackets, accessories and funky belts! Although they are not his! pic.twitter.com/3kqJzbwVNG— Baadshaho (@Baadshaho) July 6, 2017दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करीत आहेत. या अगोदर त्यांनी ‘कच्चे धागे’, ‘चोरी चोरी’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, चित्रपटाची कथा १९७५ च्या आणीबाणीच्या अवतीभोवती फिरते. रिलीज करण्यात आलेल्या टीजरनुसार काही लोक एका शहरातून दुसºया शहरात जाणारे सोन्याने भरलेले ट्रक्स लुटण्याचा प्रयत्न करतात. या लोकांकडे केवळ ९६ तासांचा वेळ असतो. यादरम्यानचाच थरार चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Do you see Imran Hashmi's look in Half Jacket and Funky belt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.