जेव्हा नवाबच्या मुलीला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, सारा अली खाननेच सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:42 PM2021-12-23T15:42:37+5:302021-12-23T15:47:47+5:30

'अतरंगी रे' (Atrangi Re) साठी वेगवेगळ्या ठिकाणी सध्या प्रमोशन करण्यात मुलाखती देण्यात सारा खान (Sara Ali Khan) सध्या बिझी आहे. सध्या एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत एक किस्सा सांगितला.हा किस्सा सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Do you know, why Sara Ali Khan was treated as beggar during her childhood & was given money, check Revelation here | जेव्हा नवाबच्या मुलीला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, सारा अली खाननेच सांगितला किस्सा

जेव्हा नवाबच्या मुलीला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, सारा अली खाननेच सांगितला किस्सा

googlenewsNext

नवाब घराण्याची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khna) हिने फार कमी कालावधीत चित्रपट जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खानने 2018 साली 'केदारनाथ' (Kedarnath Movie) या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, पण साराने रसिकांची पसंती मिळवत अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली.

छोटे नवाब सैफ अली खान  (Sai Ali Khan) आणि अभिनेत्री अमृता सिंह (Amrita Singh) यांची लेक सारा अली खान नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. 'अतरंगी रे' सिनेमामुळेही ती सध्या प्रचंड चर्चेत आहे. धनुष आणि अक्षय कुमार यांचा आगामी चित्रपट 'अतरंगी रे' ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर 24 डिसेंबर 2021 रोजी होईल. या चित्रपटात सारा अली खान रिंकू सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, धनुष (Dhanush) विष्णूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) रिंग मास्टर आहे, ज्याचं नाव अनिल आहे.

'अतरंगी रे' साठी वेगवेगळ्या ठिकाणी सध्या प्रमोशन करण्यात मुलाखती देण्यात सारा सध्या बिझी आहे. सध्या एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत एक किस्सा सांगितला.हा किस्सा सध्या प्रचंड चर्चेत आहे. किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साराच्या लहानपणीचा हा किस्सा आहे. साराचा खेळकर स्वभाव सगळ्यांनाचा चांगलाच माहिती झाला आहे. 

लहानपणापासूनच सारा अगदी तशीच आहे. एकदा  सैफ अली खान आणि आई अमृता सिंहसोबत सारा एका घड्याळाच्या दुकानात गेले होते. तेव्हा सारा दुकानाच्या बाहेर राहून डान्स करत होती. एका माणसाने साराला डान्स करताना पाहिले आणि तिला पैसे दिले. साराला या सगळ्या गोष्टी अगदी मजेशीर वाटल्या. त्या माणसाने दिलेले पैसेही तिने अगदी सांभाळून ठेवले.डान्स करत असल्याचे पाहून त्या माणसाने तिला पैसे दिले यामुळे साराही खुप खुश होती.साराच्या तोंडून हा किस्सा ऐकताच उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते.

Web Title: Do you know, why Sara Ali Khan was treated as beggar during her childhood & was given money, check Revelation here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.