​शाहरूख खानच्या ‘तीन बुराईयां’ तुम्हाला ठाऊक आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:33 IST2017-11-08T10:03:28+5:302017-11-08T15:33:28+5:30

शाहरूख खान तर बॉलिवूडचा ‘बादशाह’ आहे. पण त्याच्यापेक्षा त्याची मुले सध्या चर्चेत आहेत. होय, मग तो चिमुकला अबराम असो, ...

Do you know of Shah Rukh Khan's "three evils"? | ​शाहरूख खानच्या ‘तीन बुराईयां’ तुम्हाला ठाऊक आहेत?

​शाहरूख खानच्या ‘तीन बुराईयां’ तुम्हाला ठाऊक आहेत?

हरूख खान तर बॉलिवूडचा ‘बादशाह’ आहे. पण त्याच्यापेक्षा त्याची मुले सध्या चर्चेत आहेत. होय, मग तो चिमुकला अबराम असो, लाडकी सुहाना असो किंवा मग हँडसम आर्यन असो. हे तिन्ही मुले म्हणजे, शाहरूखचा जीव की प्राण. अबराम, आर्यन, सुहाना या तिघांवरही शाहरूख जिवापाड प्रेम करतो आणि वेळोवेळी हे प्रेम व्यक्तही करतो. 



ALSO READ: ​आनंद एल रायच्या चित्रपटात काहीसा असा दिसेल शाहरूख खान! शेअर केले फर्स्ट लूक!!

आज शाहरूखने आपल्या तिन्ही मुलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे,या फोटोला शाहरूखने दिलेले कॅप्शन. होय, अबराम, सुहाना व आर्यनचा फोटो शेअर करत शाहरूखने या फोटोला एक क्यूट कॅप्शन दिले आहे. ‘या फोटोत दिसताहेत माझे तीन दोष: ग्रेस, स्टाईल अ‍ॅण्ड प्लेफुलनेस’,असे शाहरूखने लिहिलेय. आहे ना क्यूट...आपल्या तीन मुलांचे वर्णन करायला यापेक्षा सुंदर आणि हटके शब्द कुठले बरे असू शकतील? या कॅप्शनवरून स्पष्ट आहे, ते म्हणजे, सुहाना ग्रेसफुल आहे. आर्यन स्टायलिश आणि अबराम खट्याळ.
शाहरूख कायम अबरामचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन याला मात्र स्व:चे फोटो शेअर करणे फारसे आवडत नाही. याऊलट शाहरूखची अतिलाडकी सुहाना मात्र अलीकडे स्वत:चे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अलीकडे शाहरूखचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सुहानाने आपल्या मैत्रिणींसोबत धम्माल केली. त्यामुळेच शाहरूखपेक्षा तिचीच अधिक चर्चा झाली. आर्यन मात्र या सेलिब्रेशनमध्ये दिसला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन व सुहाना यांच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण आपल्या मुलांनी शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर त्यांना वाटेल त्या क्षेत्रात करिअर करावे, असे शाहरूखचे मत आहे. तूर्तास शाहरूख आनंद एल राय यांच्या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्वद्याप ठरलेले नाही. पण यात शाहरूख एका बुटक्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Do you know of Shah Rukh Khan's "three evils"?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.