​सुनील शेट्टीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 15:11 IST2016-11-09T11:26:16+5:302016-11-09T15:11:51+5:30

आज ऑनलाइनचा जमाना आहे असे म्हटले जाते. प्रत्येकजण शॉपिंगच्या वेगवेगळ्या साईटवरून आपल्याला शॉपिंग करताना पाहायला मिळतात. कपडे, बूट, घरातील ...

Do you know this secret of Sunil Shetty? | ​सुनील शेट्टीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का?

​सुनील शेट्टीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का?

ऑनलाइनचा जमाना आहे असे म्हटले जाते. प्रत्येकजण शॉपिंगच्या वेगवेगळ्या साईटवरून आपल्याला शॉपिंग करताना पाहायला मिळतात. कपडे, बूट, घरातील सगळ्याच वस्तू ऑनलाईन घेण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. खरे तर आजकाल लोकांना शॉपिंगला जायलाही वेळ नाहीये. त्यामुळे ते आपली शॉपिंगची आवड ऑनलाइन पूर्ण करतात. 
आजची तरुण पिढी तर ऑनलाइन शॉपिंगच्या प्रेमात पडली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ऑनलाइनचे आज क्रेझ पाहाता सामान्य लोकांप्रमाणे सगळे सेलिब्रेटीदेखील ऑनलाइन शॉपिंग करत असतील असे तुम्हाला वाटत असेल. पण याला काही सेलिब्रेटी अपवाद आहेत. मी कधीच ऑनलाइन शॉपिंग केले नाही असे सुनील शेट्टी सांगतो. लोक ऑनलाइन खरेदी कसे करतात हा त्याला नेहमीच प्रश्न पडतो अशी कबुलीदेखील तो देतो. सुनील सांगतो, "आज अनेक ऑनलाइन शॉपिंग साईट्स आहेत. त्या शॉपिंग साइटवर लोक कपड्यांपासून, चप्पलपर्यंत सगळ्याच गोष्टींची खरेदी करताना दिसतात. पण ऑनलाईन खरेदी करण्याचा मी कधी विचारदेखील करू शकत नाही. कपडे घेताना त्या कपड्याला जोपर्यंत मी हात लावून पाहात नाही, तोपर्यंत मी कपडे घेतच नाही. माझी ही अनेक वर्षांपासूनची सवय आहे. त्यामुळे मी स्वतःची शॉपिंग स्वतः करतो. तसेच कपड्यांची किंमत काय आहे याहीपेक्षा कपडे बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले गेले आहे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. मी फॅब्रिक पहिल्यांदा तपासतो, त्यानंतरच किंमत पाहतो. त्यामुळे मी ऑनलाइनच्या फंद्यात कधीच पडत नाही.  

 

Web Title: Do you know this secret of Sunil Shetty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.