धोनीची पत्नी साक्षी अन् विराटची पत्नी अनुष्का यांच्यातील नाते तुम्हाला माहिती आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 21:08 IST2017-12-27T15:38:57+5:302017-12-27T21:08:57+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथे गेल्या मंगळवारी पार ...

Do you know the relationship between Dhoni's wife and Virat's wife Anushka? | धोनीची पत्नी साक्षी अन् विराटची पत्नी अनुष्का यांच्यातील नाते तुम्हाला माहिती आहे काय?

धोनीची पत्नी साक्षी अन् विराटची पत्नी अनुष्का यांच्यातील नाते तुम्हाला माहिती आहे काय?

रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथे गेल्या मंगळवारी पार पडले. या रिसेप्शन सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू उपस्थित होते. माजी कर्णधार एम. एस. धोनी हादेखील पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत सोहळ्यात पोहोचला होता. बºयाच लोकांना असे वाटत होते की, विराटमुळे धोनी आणि साक्षी या सोहळ्यात पोहोचले असतील. परंतु असे नसून, धोनीची पत्नी साक्षी आणि विराटची पत्नी अनुष्का खूप चांगल्या मैत्रीनी असून, शालेय जीवनापासून त्यांच्यात गट्टी आहे. 



याचा खुलासा साक्षी आणि अनुष्काच्या काही जुन्या फोटोंवरून होतो. साक्षी आणि अनुष्काचे हे फोटो अनुष्काच्या फॅन क्लब ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. या दोघींचे चाहत्यांनी असे काही फोटो शेअर केले, जे बघून सगळेच चकीत झाले आहेत. दोघींचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अनुष्काने स्वत:च याबाबतचा खुलासा करताना साक्षी आणि मी एकत्र शिक्षण घेतल्याचे सांगितले. 





२०१० मध्ये धोनीसोबत लग्न झाल्यानंतर साक्षी आणि अनुष्काची पुन्हा भेट झाली नव्हती. मात्र या रिसेप्शन सोहळ्यात पुन्हा एकदा या जुन्या मैत्रिणी एकमेकींना भेटल्या. दरम्यान साक्षीने सांगितले की, आम्हा दोघींचे मार्घेरिटाच्या सॅण्टमॅरी स्कुलमध्ये शिक्षण झाले. जेव्हा या दोघींनी त्यांचे हे जुणे फोटो बघितले तेव्हा त्यांना एकमेकींना ओळखणे अवघड झाले. 

Web Title: Do you know the relationship between Dhoni's wife and Virat's wife Anushka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.