​सैफ अली खानच्या हातात असलेल्या चिमुकलीला तुम्ही ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 10:07 AM2018-03-10T10:07:52+5:302018-03-10T15:37:52+5:30

सैफ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमुर सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तैमुर हा ...

Do you know the kid in the hands of Saif Ali Khan? | ​सैफ अली खानच्या हातात असलेल्या चिमुकलीला तुम्ही ओळखले का?

​सैफ अली खानच्या हातात असलेल्या चिमुकलीला तुम्ही ओळखले का?

googlenewsNext
फ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमुर सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तैमुर हा खूप गोंडस असल्याने त्याची एक छबी तरी कॅमेऱ्यात कैद करायला मिळावी यासाठी मीडियाचे कॅमेरे नेहमीच सरसावलेले असतात. तैमुर सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तैमुर इतकीच त्याची बहीण सारा अली खान देखील लहानपणी क्युट होती. सारा अली खानचा एक लहानपणीचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये चिमुकली सारा आपल्याला सैफ अली खानसोबत पाहायला मिळत आहे. गुलाबी रंगाच्या टी-शर्टमध्ये ही चिमुकली खूपच गोड दिसत आहे. तिच्या केसांचे दोन बो देखील बांधलेले आहेत. सैफ देखील या फोटोत खूपच हँडसम दिसत आहे. सारा अलीच्या सौंदर्यावर आज तर अनेकजण फिदा आहेत.
सारा अली खान ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे. ती ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. या चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेक्स्ट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. साराचा ‘केदारनाथ’ या वर्षाच्या अखेरिस रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या वेळी साराने केलेल्या करारानुसार हा चित्रपट रिलीज झाल्याशिवाय सारा दुसरा कुठलाही चित्रपट साईन करू शकत नाही. साराला बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी तिची आई अभिनेत्री अमृता सिंग प्रचंड मेहनत घेत आहे. अमृता अनेकवेळा आपल्याला सारासोबत बॉलिवूड पार्ट्यांमध्ये पाहायला मिळते. 

Also Read : केदारनाथ चित्रपटाची शूटिंग बंद नाही झाली हा घ्या पुरावा !

Web Title: Do you know the kid in the hands of Saif Ali Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.