फोटोतील या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:00 AM2021-05-22T09:00:00+5:302021-05-22T09:00:00+5:30

ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Do you know this cute girl in the photo? She is going to make her Bollywood debut soon | फोटोतील या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण

फोटोतील या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण

googlenewsNext

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे. नुकतेच रश्मिका मंदानाने या चित्रपटाच्या कामाला सुरूवात केली आहे.


रश्मिका मंदाना सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, कोरोना जाण्याची प्रतीक्षा करत आहे.  


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने इंस्टाग्रामवर तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा फोटो शेअर करत तिने मिशन मजनू चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केल्याचे सांगितले होते. या फोटोत तिच्या आणि सिद्धार्थच्या हातात स्क्रीप्ट पहायला मिळते. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, अहहह.. माझ्या टीमला जॉइन करण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. चला, तर मिशनला सुरूवात करूयात.


'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन 'मिशन मजनू' हा चित्रपट तयार करणार आहे.


या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले.

परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.

Web Title: Do you know this cute girl in the photo? She is going to make her Bollywood debut soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.