बॉलिवूडचे हे धुरंधर ‘वकील’ तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 21:17 IST2017-02-02T15:47:27+5:302017-02-02T21:17:27+5:30

कोर्ट-कचेरी, वकील, न्यायाधीश हे शब्द जरी कानावर पडले तरी थरकाप होतो. मात्र जेव्हा पडद्यावर कोर्ट ड्रामा रंगतो, तेव्हा मात्र ...

Do you know this Bollywood fanatic 'lawyer'? | बॉलिवूडचे हे धुरंधर ‘वकील’ तुम्हाला माहित आहेत का?

बॉलिवूडचे हे धुरंधर ‘वकील’ तुम्हाला माहित आहेत का?

ong>कोर्ट-कचेरी, वकील, न्यायाधीश हे शब्द जरी कानावर पडले तरी थरकाप होतो. मात्र जेव्हा पडद्यावर कोर्ट ड्रामा रंगतो, तेव्हा मात्र तो बघावासा वाटतो. खरं तर वास्तविक न्यायालयात रंगणारा खटला अन् पडद्यावर रंगणारा खटला यात बराच फरक आहे. पण काहीही असो ज्या पद्धतीने पडद्यावर कोर्ट ड्रामा रंगविला जातो, तो प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा असतो हे नक्की. अर्थातच यात वकिलाची भूमिका साकारणाºया अभिनेत्यांचा दमदार आवाज अन् त्याचे चातुर्य भावणारे असते. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बरेचसे अभिनेते वकिलांच्या भूमिकेत झळकले आहेत; मात्र काही अशा भूमिका आहेत ज्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. ‘जॉली एलएलबी-२’ मध्ये अक्षयने अशीच अविस्मरणीय भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 



गोविंदा
‘क्यो की मैं झूठ नही बोलता’ या सिनेमात गोविंदाने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांना आठवते. आपल्या अंदाजात तो कोर्टात खºयाचं खोटं सिद्ध करण्यात कसा यशस्वी होतो हे दाखविण्यात आले होते. गोविंदाचा हा अंदाज त्यावेळेस प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. 



सनी देओल
‘तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा डायलॉग कोणाला माहीत नसेल, असे म्हणणेच बहुधा चुकीचे ठरेल. ‘दामिनी’मध्ये अ‍ॅडव्होकेट गोविंदाची भूमिका साकारणाºया सनी देओलने खºया अर्थाने ही भूमिका अजरामर केली आहे. कोर्टातील डावपेच, संवाद, अ‍ॅग्रेसिव्हपणा, प्रतिस्पर्धी वकिलाची खिल्ली अशा सर्वच खूबी या भूमिकेतून सनी देओलमध्ये बघावयास मिळाल्या. या भूमिकेसाठी सनी देओलला सहायक अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 



अनिल कपूर
‘जीत जायेंगे हम, तू अगर संग है’ हे सुपरहिट गीत असलेल्या ‘मेरी जंग’ या सिनेमातील अनिल कपूर याने साकारलेल्या अ‍ॅडव्होकेट अरुण वर्माची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अ‍ॅड. जी. डी. ठकरालच्या भूमिकेत असलेल्या अमरिश पुरी यांचाही अभिनय त्यावेळेस कौतुकास्पद ठरला होता. त्यामुळे जेव्हा केव्हा वकिलांशी संबंधित सिनेमांचा उल्लेख केला जातो, तेव्हा ‘मेरी जंग’ हा सिनेमा प्रकर्षाने समोर येतो. हा सिनेमा १९८५ मध्ये रिलिज झाला होता. मात्र आजही तो प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 



रानी मुखर्जी
२००४ मध्ये आलेला ‘वीर जारा’ या सिनेमात अ‍ॅड. सामिया सिद्दीकी ही भूमिका राणी मुखर्जी हिने दमदारपणे साकारली होती. रानीने ज्या पद्धतीने एका विस्मरण व्यक्तीला कोर्टात न्याय मिळवून देण्याचा अभिनय केला होता, त्यावरून तिचे सर्वत्र कौतुकच केले गेले होते. रानीच्या या अभिनयाच्या जोरावर सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सिनेमात शाहरूख खान आणि प्रिती झिंटा यांची लव्ह स्टोरी दाखविण्यात आली होती. भारत-पाक संबंधांवर हा सिनेमा आधारित होता. 

Web Title: Do you know this Bollywood fanatic 'lawyer'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.