​तापसीला अ‍ॅक्शन सीन करताना त्रास नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 18:28 IST2016-11-06T18:28:50+5:302016-11-06T18:28:50+5:30

‘पिंक’ मधील दमदार अभिनयानंतर अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ‘नाम शबाना’ या चित्रपटात तिने ...

Do not Trouse Taking Action Actions! | ​तापसीला अ‍ॅक्शन सीन करताना त्रास नाही!

​तापसीला अ‍ॅक्शन सीन करताना त्रास नाही!

ong>‘पिंक’ मधील दमदार अभिनयानंतर अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ‘नाम शबाना’ या चित्रपटात तिने दमदार अ‍ॅक्शन सीन साकारले आहेत. मात्र, हे अ‍ॅक्शन सीन करताना मला फार त्रास झाला नाही, असे तापसीने सांगितले. 

तापसी पन्नू व अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असणारा ‘नाम शबाना’ हा ‘बेबी’ या चित्रपटाचा सिक्वल असल्याचे सांगण्यात येत आहे. आता ‘नाम शबाना’मध्येही तापसीचा अ‍ॅक्शन अवतार दिसणार आहे. विशेष म्हणजे  या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृष्यांसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. 



तापसी म्हणाली, या चित्रपटासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे. यात भरपूर अ‍ॅक्शन दृष्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. मला हाणामारी करणारी दृष्ये करताना फारसा त्रास झाला नाही. याचे संपूर्ण श्रेय माझा ट्रेनर सीरिल राफेल याला जाते. त्यांच्यात अ‍ॅक्शन दृष्यांप्रती भावना उत्कट आहे. त्यानी मला सहजपणे अ‍ॅक्शन कशी साकारावी हे सांगितले. ते चांगले दिग्दर्शकच नव्हे तर चांगले शिक्षकही आहेत. कोणत्या व्यक्तीला कशा प्रकारे सांगितल्यास ते अधिक सहज होऊ शकेल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी ही दृष्ये पूर्ण क रू शकले.

हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. मलेशियामध्ये या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृष्ये चित्रीत करण्यात आली आहेत. राफेल यांनी मला स्टंट कसे करावे याची माहिती दिली. अक्षय कुमारकडूनही मला बरेच काही शिकता आले, असेही तापसीने सांगितले. शिवम नायर दिग्दर्शित करीत असलेल्या ‘नाम शबाना’ या चित्रपटात कुमारची झंझावती भूमिका असेल. या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरपर्यंत चालणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Do not Trouse Taking Action Actions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.