प्रशंसा करताना अतिशयोक्ती नको - बीग बी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:30 IST2016-01-16T01:18:47+5:302016-02-07T06:30:14+5:30
'अ मितजी २४ तास काम करत असतात, अमितजींचा काम करण्याचा स्टॅमिना एखाद्या तरूण कलाकारालाही लाजवेल असा असतो' यासारख्या कॉम्प्लीमेंट्स ...

प्रशंसा करताना अतिशयोक्ती नको - बीग बी
' ;अ मितजी २४ तास काम करत असतात, अमितजींचा काम करण्याचा स्टॅमिना एखाद्या तरूण कलाकारालाही लाजवेल असा असतो' यासारख्या कॉम्प्लीमेंट्स बीग बीं ना नेहमीच मिळत असतात. परंतू मिळालेल्या माहितीनुसार, 'अमितजींना अशा अतिशयोक्ती करणारी प्रशंसा अजिबात आवडत नाही. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये लिहिले आहे की, 'तुम्हाला काम करण्यासाठी इतकी ऊर्जा कुठून मिळते, या वयातही काम करण्याची इच्छाशक्त ी तुम्ही कुठून मिळवता यांसारखे प्रश्न मला कृपा करून विचारू नका. माझ्या वयाच्या इतर कुठल्याही व्यक्तीसारखाच मी आहे. मला प्लीज असामान्य बनवू नका.' कुठलेही विशेषणे लावून केलेली अतिप्रशंसा त्यांना नकोशी वाटते. 'मी सामान्य आहे आणि मला तसेच राहुद्या.' असे ते आवर्जुन सांगतात.