DON'T MISS : ​ ‘मॉम’चा टीजर पाहा अन् नव्याने श्रीदेवीच्या प्रेमात पडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 12:20 IST2017-04-02T06:50:06+5:302017-04-02T12:20:06+5:30

श्रीदेवी एक परिपक्व अभिनेत्री आहे, याची नव्याने साक्ष देणारा ‘मॉम’ या चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला.

DO NOT MISS: Look at the teaser of 'Mom' and come in love with Sridevi! | DON'T MISS : ​ ‘मॉम’चा टीजर पाहा अन् नव्याने श्रीदेवीच्या प्रेमात पडा!

DON'T MISS : ​ ‘मॉम’चा टीजर पाहा अन् नव्याने श्रीदेवीच्या प्रेमात पडा!

रीदेवी एक परिपक्व अभिनेत्री आहे, याची नव्याने साक्ष देणारा ‘मॉम’ या चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला. ‘इंग्लिश-विंग्लिश’नंतर श्रीदेवीने पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे दमदार एन्ट्री केलीय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. श्रीदेवीच्या आयुष्यातील उलथापालथ या टीजरमध्ये दिसतेय. तिच्या आयुष्यात काहीही ठीक नाहीय, अशावेळी अक्षय खन्ना तिच्या मदतीसाठी हात पुढे करतो, असे टीजरमध्ये दिसते. यानंतर टीजरच्या अखेरिस श्रीदेवीचा एक संवाद एकायला येतो. ‘गलत आरै बहुत गलत में से चुनना हो तो आप क्या चुनेंगे?’ असा प्रश्न ती विचारताना दिसते.



 ‘मॉम’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही बोलले जात आहे. पण या टीजरमध्ये नवाजुद्दीनची साधी झलकही नाही. याचा अर्थ नवाजुद्दीन या चित्रपटात सरप्राईज पॅकेजच्या रूपात असणार आहे. नवाज या चित्रपटात कॅमिओ करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटाच्या पटकथेबाबत अद्याप काहीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. या चित्रपटात अक्षय खन्ना व अभिमन्यू सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शिवाय अदनान सिद्दीकी आणि सजल अली हे दोन पाकिस्तानी कलाकारही आहेत. यापैकी अदनान श्रीदेवीच्या आॅनस्क्रीन पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर  अभिनेत्री सजल अली ही श्रीदेवीच्या मुलीच्या भूमिकेत आहे. येत्या १४ जुलैला हा चित्रपट तुमच्या आमच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत बघा या चित्रपटाचा दमदार टीजर. जो पाहून तुम्ही पुन्हा एकदा श्रीदेवीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

ALSO READ : श्रीदेवीच्या ‘मॉम’चे मोशन पोस्टर रिलीज

अभिनेत्री श्रीदेवी सन २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. 

Web Title: DO NOT MISS: Look at the teaser of 'Mom' and come in love with Sridevi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.