Don't miss : ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे चौथे गाणे ‘मेरे दिल में’ रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 13:59 IST2017-05-03T08:29:44+5:302017-05-03T13:59:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर स्टारर ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. इमोशनल तेवढेच रोमान्सने भरलेल्या या गाण्यात श्रद्धा व अर्जुनची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.

Do not miss: Half Girlfriend's fourth song 'Mere Dil Mein' release !! | Don't miss : ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे चौथे गाणे ‘मेरे दिल में’ रिलीज!!

Don't miss : ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे चौथे गाणे ‘मेरे दिल में’ रिलीज!!

लिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर स्टारर ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. इमोशनल तेवढेच रोमान्सने भरलेल्या या गाण्यात श्रद्धा व अर्जुनची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. शिवाय गाण्याला रॅपचा असा काही तडका दिला गेला आहे, की तुम्ही या गाण्यावर ठेका धरलाच म्हणून समजा. ‘मेरे दिल में’ असे बोल असलेले हे गाणे गायले आहे वरोनिका मेहता आणि यश नार्वेकर या दोघांनी. ऋषी रिच याचे कम्पोझिंग असलेल्या या गाण्यात काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर केला गेला आहे. शिवाय म्युझिकसोबत अर्जुनचे काही डायलॉग्सही आहेत. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे हे गाणे आत्तापर्यंतच्या गाण्यापैकी एकदम हटके आहे. गाणे हटके आहे तितकेच यातील श्रद्धाचे सौंदर्यही हटके आहे.



आत्तापर्यंत ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ची तीन गाणी रिलीज झाली आहेत. ‘बारिश’, ‘तू थोडी देर और ठहर जा’ आणि ‘मैं फिर भी तुमको चाहुंगा’ अशी ही गाणी आहेत. या तिन्ही गाण्यांना सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. ‘मेरे दिल में’ हे या चित्रपटाचे चौथे गाणे. या गाण्यालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळणार, यात आम्हाला तरी कुठलीच शंका वाटत नाहीय. तुम्हाला हे गाणे कसे वाटते? यातील श्रद्धा-कपूरची केमिस्ट्री कशी वाटली? आम्हाला नक्की सांगा.

ALSO READ : ‘हाफ गर्लफ्रेण्ड’मधील नव्या गाण्यात पहा श्रद्धा कपूरचा कातिलाना अंदाज!

‘हाफ गर्लफ्रेन्ड’मध्ये अर्जुन कपूरने माधव झा या पात्राची भूमिका साकारली आहे, तर श्रद्धा कपूर रिया सोमानीच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या कांदबरीवर हा चित्रपट आधारित असून, मोहित सुरी यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ मे रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Do not miss: Half Girlfriend's fourth song 'Mere Dil Mein' release !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.