DON't MISS : ३० वर्षांनंतर आपल्या चाळीतील घरात पोहोचला जग्गू दादा...पाहा, जॅकी श्रॉफ यांचा ‘मस्तमौला’ अंदाज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 11:06 IST2018-03-28T05:33:18+5:302018-03-28T11:06:02+5:30
जॅकी श्रॉफ म्हणजे बॉलिवूडचा ‘मस्तमौला’ अभिनेता. स्वभावाने कमालीचा बिनधास्त असलेला हा जग्गू दादा आजही भूतकाळात रमतो. केवळ भूतकाळात रमत नाही तर भूतकाळात जगतो. होय, विश्वास बसत नसेल तर जॅकी श्रॉफ यांचे हे ताजे व्हिडिओ आणि या व्हिडिओ मागचा किस्सा तुम्ही ऐकायलाच हवा.

DON't MISS : ३० वर्षांनंतर आपल्या चाळीतील घरात पोहोचला जग्गू दादा...पाहा, जॅकी श्रॉफ यांचा ‘मस्तमौला’ अंदाज!!
ज की श्रॉफ म्हणजे बॉलिवूडचा ‘मस्तमौला’ अभिनेता. स्वभावाने कमालीचा बिनधास्त असलेला हा जग्गू दादा आजही भूतकाळात रमतो. केवळ भूतकाळात रमत नाही तर भूतकाळात जगतो. होय, विश्वास बसत नसेल तर जॅकी श्रॉफ यांचे हे ताजे व्हिडिओ आणि या व्हिडिओ मागचा किस्सा तुम्ही ऐकायलाच हवा. होय, अलीकडे जॅकी श्रॉफ अभिनेता अर्जन बाजवासोबत कोलाबाच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करून परतत असतानाचा हा किस्सा. अर्जन याचा साक्षीदार. त्यानेच हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
त्याचे झाले असे की, जॅकी व अर्जन दोघेही डिनर करून रात्री घरी परतत असतानाच, अचानक दोन बाइकर्सनी त्यांना सिग्नल दिला. एका ट्रॅफिक सिग्नलवर हे दोन्ही बाईकर्स जॅकीच्या गाडीसोबत आले आणि तुम्ही ज्या घरात राहायचे, त्याच घरात आम्ही राहतो, असे जॅकीला म्हणाले. त्या बाईकर्सची ती गोष्ट ऐकून जॅकी कमालीचा भावूक झाला आणि त्याने लगेच युटर्न घेत गाडी वल्केश्वरकडे फिरवली. थोड्यात वेळात जॅकी अर्जनसोबत आपल्या तीन बत्ती भागातील जुन्या घरात जावून पोहोचला.
याच घरात जॅकी ३० वर्षे राहिला होता. घरात पाऊल ठेवताच,जॅकीच्या डोळ्यांपुढे सगळ्या जुन्या आठवणी तरळल्या. इथे अम्मा जेवण बनवायची. येथे आम्ही आंघोळ करायचो. ही आमची बाल्कनी होती. याच ठिकाणी आम्ही एक रॉड टांगून व त्यावर चादर टाकून एका खोलीच्या दोन दोन खोल्या बनवल्या होत्या, असे जॅकी सांगत राहिला. घरातील कोपरा नि कोपरा त्याने न्याहाळला आणि मस्तपैकी भूतकाळ जगला...जग्गू दादा बाल्कनीत उभा असताना हे घर विकत घेऊन टाक ना, असा एक शेजारी त्याला म्हणाला. यावर ‘मैं खरीदना चाहता हूं, पर ये बेचना नहीं चाहते,’ असे जग्गू दादा म्हणाला.
ALSO READ : ‘या’ गोष्टीमुळे जॅकी श्रॉफ यांना भरते धडकी!
आज जॅकी श्रॉफ ६१ वर्षांचे आहेत. ‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणाºया जॅकी यांना परिस्थितीमुळे ११ वी नंतर शिक्षण सोडावे लागले होते. पोटापाण्यासाठी त्यावेळी त्यांनी एका ट्रॅव्हल एजन्सीत काम केले आणि अचानक एकेदिवशी मॉडेलिंगची संधी त्यांना मिळाली. १९८२ मध्ये ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पण त्यांना खरी ओळख दिली ती ‘हिरो’ या चित्रपटाने. या चित्रपटाने जॅकी यांना एका रात्रीत स्टार बनवले.