दिशा पटानीने सोशल मीडियावर शेअर केला थ्रो बॅक व्हिडीओ व्हायरल, ही आहे व्हिडीओची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 14:56 IST2020-08-18T14:50:11+5:302020-08-18T14:56:06+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

दिशा पटानीने सोशल मीडियावर शेअर केला थ्रो बॅक व्हिडीओ व्हायरल, ही आहे व्हिडीओची खासियत
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती फॅन्ससोबत शेअर करत असते. दिशा आपल्या वर्कआऊट दरम्यानचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच दिशाने तिचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे जो बघून फॅन्स अवाक् झाले आहेत. या व्हिडीओत दिशा वेटलिफ्टिंग करताना दिसतेय.
या व्हिडीओत दिशा 80 किलो वजनासह फुल रेंज स्क्वाट करताना दिसत आहे. दिशाने तिचे दोन थ्रो बॅक व्हिडीओ शेअर केले
आहेत. या व्हिडीओला दिशाने, हॅशटॅग थ्रोबॅक जेव्हा मी स्ट्राँग होते, त्यावेळी मी 75 किलोच्या वजनसोबत रैप करायची तर दुसऱ्या व्हिडीओत 80 किलोसोबत 1 फुल रेंज स्क्वाट करत होती.
वर्कफ्रंट बाबत दिशा शेवटची मलंग सिनेमात दिसली होती. ज्यात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू होते. दिशा आता 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' सिनेमात दिसणार आहे. सलमान खानसोबत दिशा यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.