शूजित सरकारांसोबत क्वचितच व्हायची चर्चा - तापसी पन्नू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 19:06 IST2017-01-12T19:06:54+5:302017-01-12T19:06:54+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अक्षय कुमारसोबतच्या ‘बेबी’ चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे चर्चेत आली. त्यानंतर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ...

Discussion of having rarely been with the Shojiat government - Tapi Pannu | शूजित सरकारांसोबत क्वचितच व्हायची चर्चा - तापसी पन्नू

शूजित सरकारांसोबत क्वचितच व्हायची चर्चा - तापसी पन्नू

क्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अक्षय कुमारसोबतच्या ‘बेबी’ चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे चर्चेत आली. त्यानंतर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘पिंक’ चित्रपटामुळे तिने सर्वसामान्यांबरोबरच समीक्षकांच्याही मनात घर केले. आता ती पुन्हा एकदा ‘रनिंगशादी डॉट कॉम’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आलीय. चित्रिकरणामुळे प्रभावित झालेली तापसी म्हणते,‘ चित्रपटाचे निर्माते शूजित सरकार यांच्यासोबत आमची क्वचितच चर्चा व्हायची. पण त्यांनी एका शब्दानेही केलेलं आमचं कौतुक हे खूप मोठ्ठं बळ देऊन जायचं.’ 

                        

‘पिंक’च्या प्रदर्शनानंतर तापसी पन्नू हिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. वेगवेगळ्या भूमिका करण्यात रूची असलेली तापसी आता ‘रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटात अतिशय चुलबुल्या अशा मीनल अरोराच्या भूमिकेत दिसणार आहे. अमित रॉय दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते रोनी लहिरी आणि शूजित सरकार हे आहेत. चित्रिकरणावेळीचा एक किस्सा शेअर करताना तापसी म्हणते,‘ रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटासाठी जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मी सरकारांना भेटले नव्हते. शूटिंगवेळीही ते येत नसत. ते केवळ एकदाच सेटवर आले तेव्हाच त्यांच्यासोबत एकदा चर्चा झाली. मात्र, त्यांच्यासोबत झालेली चर्चा ही नक्कीच प्रेरणादायी ठरायची.’ 

‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपट अशा दोन युवकांवर आधारित आहे, जे पळून जाऊन लग्न करणाऱ्याचे लग्न लावून देतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यात तापसी मीनल अरोराची भूमिका साकारते आहे. 

Web Title: Discussion of having rarely been with the Shojiat government - Tapi Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.