Dirty Truths : बॉलिवूड इंडस्ट्रीचे पडद्यामागील वास्तव अंगावर शहारे आणणारे; वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 17:32 IST2017-03-30T11:55:32+5:302017-03-30T17:32:06+5:30
हॉलिवूड आणि चायना इंडस्ट्रीनंतर तिसºया क्रमांकावर असलेल्या बॉलिवूडमध्ये देश- विदेशांतील हुरहुन्नरी कलाकार नशीब आजमावण्यासाठी येतात. काही यशस्वी होतात तर ...
.jpg)
Dirty Truths : बॉलिवूड इंडस्ट्रीचे पडद्यामागील वास्तव अंगावर शहारे आणणारे; वाचा सविस्तर!
अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे नाते तसे जुनेच म्हणावे लागेल. कारण आजही बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा लावला जातो. अर्थात हे सर्व गुपीत असल्याने सहजासहजी समोर येत नाही. सलमान खान, प्रिती झिंटा, राणी मुखर्जी स्टारर ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाबाबत याविषयीची चर्चा रंगली होती. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याने या चित्रपटाच्या प्रॉडक्शनमध्ये पैसा लावला होता. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटाच्या निर्मितीत अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समोर आले होते.
अभिनेत्रींचे सेक्शुअलायजेशन
‘यूएन’च्या सर्व्हेनुसार ३५ टक्के अभिनेत्रींना न्यूड सीन्समधून दाखविले जाते. ‘आयटम नंबर’ हे त्याचेच उदाहरण आहे. कारण आयटम नंबरमधून संबंधित अभिनेत्रीला प्रेक्षकांसमोर अतिशय तोकड्या कपड्यांमध्ये सादर केले जाते. यात बहुतांश मॉडेल्स किंवा हॉटनेससाठी ओळखल्या जाणाºया अभिनेत्रींना दाखविले जाते. हल्ली तर आयटम नंबर जणू काही त्या चित्रपटाचा आत्माच असतो.
कास्टिंग काउच
कास्टिंग काउच बॉलिवूडमधील असे वास्तव आहे, ज्याचा कित्येक अभिनेत्रींना सामना करावा लागतो. विशेषत: न्यूकमर्सला ब्रेक देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्यावर याकरिता दिग्दर्शकांकडूनच दबाव आणला जातो. अभिनेता शक्ती कपूर आणि अमन वर्मा यांच्यावर अशाप्रकारचे आरोप लावले गेले आहेत. बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री कंगना राणौतने एका मुलाखतीत म्हटले होते की, करिअरच्या सुरुवातीला तिला अशाप्रकारच्या घटनांचा सामना करावा लागला. आॅडिशननंतर मला सेक्सची डिमांड केली जात असे. मात्र मी यास स्पष्ट शब्दात नकार देत असे असा खुलासा कंंगनाने केला होता. ममता कुलकर्णी हिने ‘चायना गेट’च्या शूटिंगदरम्यान राजकुमार संतोषी यांच्यावर कास्टिंग काउचचा आरोप लावला होता.
पायरेसीचे मायाजाल
बॉलिवूडमध्ये पायरेसीचा मुद्दा काही नवीन नाही. मात्र यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान बॉलिवूडकरांना सहन करावे लागते. ‘बॉलिवूड-हॉलिवूड कोलॅबरेटिव्ह स्टडी’च्या माहितीनुसार बाजारात चित्रपटांच्या पायरेटेड कॉपी पाच रुपयांत, तर इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे दरवर्षी बॉलिवूडकरांना १७ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागते, तर पाच पाच रुपयात सीडी-डिव्हीडी विकणारे लाखो रुपयांची उलाढाल करीत असतात. ९० कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या ‘सुलतान’ या चित्रपटाचे कॉपी केवळ पाच रुपयात विकण्यात आली. विशेष म्हणजे ज्या दिवशी सुलतान रिलीज झाला, त्याचदिवसाच्या दुपारी ‘सुलतान’ची पायरेटेड कॉपी बाजारात उपलब्ध होती. हा फटका केवळ ‘सुलतान’लाच बसला असे नाही, तर जवळपास प्र्रत्येक चित्रपटांची पायरेटेड कॉपी बाजारात उपलब्ध असते.
महिला आणि पुरुष कलाकारांमध्ये भेदभाव
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला सक्सेसची चावी मानले जाते. मात्र अशातही महिला आणि पुरुष कलाकारांच्या मानधनात आजही प्रचंड तफावत केली जात असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘सुलतान’चेच बघा, सलमान खानने या चित्रपटातून जवळपास शंभर कोटी रुपयांची कमाई केली. मात्र अनुष्काच्या वाटेला केवळ सहा कोटी रुपयेच आले. ही तफावत पाहता, बॉलिवूडमध्ये पुरुष आणि महिला कलाकारांमध्ये आजही भेदभाव केला जात असल्याचेच स्पष्ट होते.
अवॉर्ड्समध्ये गोलमाल
दरवर्षी बॉलिवूडमध्ये अनेक अवॉडर््स सोहळे आयोजित केले जातात. मात्र बहुतांश सोहळ्यांमध्ये अवॉर्ड मॅनेज असल्याचे आरोप केले जातात. अर्थात यात वास्तवत: नाही, असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण बरेचसे कलाकार पैसे देऊन अवॉर्डस घेतात, तर काही परफॉर्मन्सच्या मोबदल्यात अवॉर्ड मॅनेज करतात. राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अक्षयकुमार याने या अवॉर्डसमागील सत्य मांडले होते. तो म्हणाला होता की, बºयाचदा मला अवॉर्ड दिला गेल्याने परफॉर्मन्सचे मानधन कमी दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यातून एकच अर्थ स्पष्ट होतो की, जर तुम्ही परफॉर्मन्सचे मानधन कमी करीत असाल तर तुम्हाला अवॉर्ड दिला जाईल, असे तो म्हणाला होता, तर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या बायोग्राफीमध्ये स्पष्ट केले की, त्यांनी त्यांच्या पहिल्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार मिळवण्यासाठी तीस हजार रुपये दिले होते.
कॉस्मेटिक सर्जरी
बॉलिवूडमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणात बघावयास मिळते. ज्या कलाकारांनी सुंदर दिसण्यासाठी या सर्जरीचा आधार घेतला त्यांनी याविषयी फारशी वाच्यता केली नाही. मात्र त्यांच्याकडे बघून लगेचच जाणवते की, त्यांनी कॉस्मेटिक सर्जरी केली. लिप सर्जरी, नोज जॉब, ब्रेस्ट इम्प्लान्ट्स, स्किन लाइटनिंग आणि हेयर ट्रांसप्लांट या सर्जरीचा सर्रासपणे आधार घेतला जातो. श्रीदेवीपासून प्रियंका चोपडा, कंगना राणौत, आएशा टाकिया यांनी सर्जरी करून आपल्या सौंदर्यात भर पाडली आहे.
वर्णभेद
बॉलिवूडमध्ये पूर्वीपासूनच वर्णभेदाचा घटना समोर येत आहेत. कारण फेयर रंगाच्याच कलाकाराला प्राथमिकता दिली जात असल्याने सावळ्या रंगाच्या कलाकारांवर एकप्रकारे अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच कोंकणा सेन, मनोज वाजपेयी, धनुष या कलाकारांना आजही करिअर टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिलादेखील वर्णभेदाचा सामना करावा लागला.
फ्लॉप म्हणजेच सोशल डेथ
बॉलिवूडमध्ये फ्लॉप होणे भयंकर पाप केल्या समान असते. कारण जो कलाकार फ्लॉप होतो, त्याला इंडस्ट्रीमध्ये कोणीही विचारत नाही. कुठलेही प्रॉडक्शन हाउस त्यांना साइन करत नाही. इतर कलाकारही त्यांना इग्नोर करतात. अभिनेत्री नादिरा हिचे उदाहरण बघा ना, ‘श्री ४२०’, ‘जूली’ आणि ‘पाकिजा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी नादिरा नंतरच्या काळात गायब झाली. पुढे एकाकी जीवन व्यथित करतानाच तिचा मृत्यू झाला.
फेस्टिव्हलवर बड्या स्टार्सची मक्तेदारी
शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षयकुमार आणि अजय देवगण या बड्या स्टार्सनी ईद, दिवाळी, ख्रिसमज यांसारख्या महत्त्वपूर्ण फेस्टिव्हलवर अक्षरश: कब्जा केला आहे. हे फेस्टिव्हल म्हणजे बॉलिवूडसाठी सुगीचे दिवस असल्याने यादिवशी याच स्टार्सची मक्तेदारी बघावयास मिळते. इतर कलाकार यांच्यासोबत फाइट करण्यास समोर येत नसल्याने वर्षानुवर्षांपासून हे स्टार्स या फेस्टिव्हलवर कब्जा करून बसले आहेत.
अखेरच्या दिवसांमध्ये जगावे लागले हालाखीचे जिणे
इंडस्ट्रीमध्ये बरेचसे असे स्टार्स होते ज्यांनी त्यांच्या-त्यांच्या काळात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. परंतु काळानुसार ते पडद्याआड गेले अन् अखेरच्या दिवसांमध्ये त्यांना प्रचंड हालपेष्टांचे जिणे जगावे लागले. ए. के. हंगल, भगवान दादा, भारत भूषण, जगदीश माळी, परवीन बॉबी ही नावे सांगता येतील. जगदीश माळी याच्यावर तर अक्षरश: भिक मागण्याची वेळ आली होती, तर ए. के. हंगल यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. परवीन बॉबी हिची तर डेथ बॉडीच आढळून आली होती.