​‘डायरेक्टर का बेटा’ वरूण धवन बनणार ‘डायरेक्टर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 12:14 IST2017-03-10T06:44:13+5:302017-03-10T12:14:13+5:30

वरूण धवन डायरेक्टर होणार आहे! होय, ऐकता ते खरे आहे. (आखिर एक डायरेक्टर का बेटा जो है) ‘बदलापूर’,‘हम्टी शर्मा ...

'Director's son' Varun Dhawan to become 'Director'! | ​‘डायरेक्टर का बेटा’ वरूण धवन बनणार ‘डायरेक्टर’!

​‘डायरेक्टर का बेटा’ वरूण धवन बनणार ‘डायरेक्टर’!

ूण धवन डायरेक्टर होणार आहे! होय, ऐकता ते खरे आहे. (आखिर एक डायरेक्टर का बेटा जो है) ‘बदलापूर’,‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’,‘एबीसीडी2’,‘ढिशूम’ आणि अगदी ताजा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’अशा अनेक चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा वरूण आता नवी इनिंग सुरु करण्याच्या विचारात आहे.  आम्ही नाही तर खुद्द वरूणनेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. अलीकडे वरूणने दोन पटकथा लिहिल्या आणि त्या त्याचे वडिल अर्थात प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन व भाऊ रोहित धवन या दोघांना दाखवल्या.  त्या पटकथांना डेव्हिड आणि रोहित यांनी लाल झेंडी दाखवली. पण वरूण नाऊमेद झाला नाही.

  माझ्या घरात दोन डायरेक्टर आहेत. त्यांचे मत मी गंभीरपणे घेतल. माझ्या या दोन पटकथा त्यांना आवडल्या नाहीत. पण माझ्यामते, त्या पटकथा इतक्याही वाईट नव्हत्या. कदाचित त्या कथा दोघांच्याही ‘टेस्ट’मध्ये बसणारा नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेने नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या मते, नाऊमेद होण्यापेक्षा मी यातून शिकायला हवे. आता मी आणखी काहीतरी भरीव लिहितोय. असे काही, ज्यावर चित्रपट बनवण्याची माझी खूप दिवसांची इच्छा आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक व निर्माता मीच असेल. कदाचित यात मी अभिनय करतानाही दिसेल, असे वरूण म्हणाला.

आता वरूणचे हे म्हणणे हसण्यावारी घेऊ नका. कारण वरूण खरोखरीच याबद्दल सिरिअस आहे. इतका की, याबद्दल त्याचा मेन्टॉर करण जोहर याच्याशी सुद्धा तो बोलला आहे. काही जवळच्या मित्रांचे मतही त्याने घेतले आहे. एकंदर काय तर वरूणला डाशरेक्टर आणि पटकथाकार होण्याच्या ध्यासाने अक्षरश: झपाटले आहे. त्याचा हा ध्यास त्याला कुठपर्यंत घेऊन जातो, ते बघूच!
  
 
 

Web Title: 'Director's son' Varun Dhawan to become 'Director'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.