दिग्दर्शक शंकर यांनी ‘२.०’बद्दल केला मोठा खुलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 18:21 IST2018-11-25T18:20:32+5:302018-11-25T18:21:17+5:30

प्रीक्वलमध्ये रजनीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका ऐश्वर्या राय बच्चनने साकारली होती. त्यामुळे आता सिक्वलमध्ये ती झळकणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याबद्दल नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी खुलासा केला आहे. 

Director Shankar made a big disclosure about '2.0' | दिग्दर्शक शंकर यांनी ‘२.०’बद्दल केला मोठा खुलासा!

दिग्दर्शक शंकर यांनी ‘२.०’बद्दल केला मोठा खुलासा!

बहुचर्चित भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ‘2.0’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘रोबोट’चा सिक्वेल आहे. या चित्रपटाची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. प्रीक्वलमध्ये रजनीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका ऐश्वर्या राय बच्चनने साकारली होती. त्यामुळे आता सिक्वलमध्ये ती झळकणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याबद्दल नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी खुलासा केला आहे. 

‘रोबोट’मध्ये ऐश्वर्याने सनाची भूमिका साकारली होती. तेव्हा सिक्वलमध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तरी आहे का असा प्रश्न विचारला असता दिग्दर्शक शंकर म्हणाले, ‘ऐश्वर्याच्या भूमिकेचा उल्लेख चित्रपटात आहे. ती प्रत्यक्षात अभिनय करताना दिसणार नाही पण तिच्या भूमिकेचा कथेच अनेकदा उल्लेख आहे.’ त्यामुळे अप्रत्यक्षपणे ऐश्वर्या या सिक्वलमध्ये सहभागी आहे असं म्हणायला हरकत नाही.

2.0’ मध्ये अ‍ॅमी जॅक्सन एका रोबोटची भूमिका साकारत आहे. दरम्यान, या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून या गाण्यावर तब्बल २० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. रजनीकांत आणि अ‍ॅमी जॅक्सन या दोघांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. येत्या गुरुवारी २९ नोव्हेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Director Shankar made a big disclosure about '2.0'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.