‘या’ दिग्दर्शकाने म्हटले, ‘लवकरच शेतकºयांप्रमाणे चित्रपट निर्मातेही आत्महत्या करतील’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 19:52 IST2017-11-12T14:22:19+5:302017-11-12T19:52:19+5:30
समाजातून चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता निर्मात्यांनाही लवकरच शेतकºयांप्रमाणे आत्महत्या कराव्या लागतील, असे विधान एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले, वाचा सविस्तर!

‘या’ दिग्दर्शकाने म्हटले, ‘लवकरच शेतकºयांप्रमाणे चित्रपट निर्मातेही आत्महत्या करतील’!
‘ ुजफ्फरनगर : द बर्निंग लव’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश कुमार यांच्या मते, ‘माझ्या चित्रपटाला उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये रिलीज करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. जर असेच चालत राहिले तर चित्रपट निर्मात्यांनाही शेतकºयांप्रमाणे आत्महत्या करण्यास सुरुवात करावी लागेल. २०१३ मध्ये घडलेल्या मुजफ्फरनगर दंगलीवर आधारित ‘मुजफ्फरनगर : द बर्निंग लव’ हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. हरीशने सांगितले की, ‘शेतकरी पावसाअभावी आणि राजकीय अनास्थेपोटी आत्महत्या करतो. अगदी तसेच काहीसे चित्रपट उद्योग आणि निर्मात्यांबाबत घडत आहे. कोणालाही चित्रपटाची निर्मिती करताना किंवा सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळविण्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत. परंतु जेव्हा चित्रपट रिलीज करण्याची वेळ येते तेव्हा असामाजिक तत्त्वामुळे त्यात अनेक अडचणी येतात. अशा स्थितीत निर्मात्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मलादेखील आता असेच काहीसे जाणवत आहे.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचे उदाहरण देताना हरीशने म्हटले की, चित्रपट निर्मात्यांवर अगदी सहजपणे निशाणा साधला जात आहे. पुढच्या काळात तर असे प्रकार आणखीनच वाढणार आहेत. खरं तर चित्रपट निर्मातेच समाजात होत असलेल्या सांप्रदायिक दंगली दाखविण्याची हिम्मत ठेवतात. ही एक कला असून, याकडे त्यादृष्टीनेच पहायला हवे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट बघून जर त्यांना त्यात काही चुकीचे वाटले तर त्यांनी त्यावर बॅन आणायला हवे. हे कोण लोक आहेत, जे चित्रपट रिलीज होऊ देत नाहीत? असेच चालू राहिले तर मग सेन्सॉर बोर्ड हवेच कशाला? असा प्रश्नही हरीशने उपस्थित केला.
मुजफ्फरनगर येथे हा चित्रपट रिलीज करण्यावरून बºयाचशा अडचणी येत आहेत. हरीशने म्हटले की, काही लोक चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडथळे निर्माण करू पाहत आहेत. कारण जर हा चित्रपट या भागात रिलीज झाला तर बºयाचशा गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे. विशेष म्हणजे थिएटर मालकही लोकांच्या विरोधामुळे सावध भूमिका घेत आहेत. वास्तविक कोणीही जाहीरपणे याबाबतची वाच्यता केली नाही, परंतु मला असे कळाले की, थिएटर मालकांना हा चित्रपट रिलीज न करू देण्यावरून धमक्या देण्यात आल्या आहेत.