पत्नी शफीनासोबत ‘लिपलॉक’ करताना दिसले दिग्दर्शक हंसल मेहता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 15:28 IST2017-11-16T09:58:28+5:302017-11-16T15:28:28+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता ‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’,‘अलिगढ’ अशा गंभीर तितक्याच वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात. पण गंभीर चित्रपट बनवणारे ४९ ...

पत्नी शफीनासोबत ‘लिपलॉक’ करताना दिसले दिग्दर्शक हंसल मेहता!
र ष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता ‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’,‘अलिगढ’ अशा गंभीर तितक्याच वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात. पण गंभीर चित्रपट बनवणारे ४९ वर्षांचे हंसल मेहता त्यांच्या ख-या आयुष्यात तितकेच रोमॅन्टिक आहेत. विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्यांची ताजी इन्स्टाग्राम पोस्ट पाहायलाच हवी.
![]()
हंसल मेहता यांनी पत्नी शफीना हुसैनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात हंसल मेहता शफीनासोबत लिप-लॉक करताना दिसत आहेत. या फोटोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा फोटो एका खास व्यक्तिने टिपला आहे. ही व्यक्ती कोण तर अभिनेता राजकुमार राव. हंसल मेहता यांचा आवडता अभिनेता राजकुमार राव. राजकुमारसोबत हंसल यांनी आत्तापर्यंत चार सिनेमे केले आहे. ‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’,‘अलिगढ’,‘उमेर्टो’ या हंसल मेहता दिग्दर्शित चारही चित्रपटात राजकुमार राव दिसला होता.
![]()
लाईमलाईटपासून दूर राहणा-या हंसल मेहता यांचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अर्थात काहींनी या फोटोवरून हंसल मेहता यांची टरही उडवली आहे. ‘हंसल मेहता किस करताना डोळे बंद करत नाहीत,’असे एका युजरने लिहिले आहे. अर्थात हंसल यांनी युजरच्या या प्रतिक्रियांवर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हंसल यांची पत्नी शफीना हुसैन या एक सोशल अॅक्टिविस्ट अर्थात सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ‘एज्युकेट गर्ल्स’ नामक एनजीओच्या संस्थापक व संचालक पद त्या सांभाळून आहेत. १९९८ मध्ये ‘...जयते’ या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. हा चित्रपट भारतीय न्यायपालिका आणि वैद्यकीय क्षेत्रातील धांदलींवर बेतलेला होता. या डार्क सिनेमानंतर ते ‘दिल पे मत ले यार’ या कॉमेडी चित्रपटासह ते परतले होते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ते छोट्या पडद्यावर सक्रिय होते. १९९३ मध्ये त्यांनी ‘खाना खजाना’ हा कुकरी शो डायरेक्ट केला होता. यात शेफ संजीव कुमार होते. ‘शाहिद’ या चित्रपटाने त्यांना खºया अर्थाने ओळख दिली. या चित्रपटाने त्यांना ६१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांनी पटकावला.