पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दिग्दर्शक एवी अरुणचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:54 PM2020-05-16T16:54:24+5:302020-05-16T16:55:06+5:30

तरुण दिग्दर्शक एवी अरुण प्रसादचे रस्ते अपघातात निधन झाले.

Director AV Arun passed away before the release of the first film | पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दिग्दर्शक एवी अरुणचे निधन

पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दिग्दर्शक एवी अरुणचे निधन

googlenewsNext

 ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनातून बॉलिवूड सावरत असताना तमीळ सिनेइंडस्ट्रीतील तरुण दिग्दर्शक एवी अरुण प्रसाद उर्फ व्यंकटचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. कोइंबतूर जवळच्या मेत्तुपलायम इथल्या एका रस्ता अपघातात अरुणचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. सिनेइंडस्ट्रीत तो वेंकट प्रक्कर या नावाने ओळखला जातो. त्याने दिग्गज दिग्दर्शक शंकर यांच्या सिनेमात सहायक म्हणून काम केले होते. अरुण काही दिवसांपासून चर्चेत होता, कारण त्याचा 4जी हा पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. 

एवी अरुणच्या अपघाताची बातमी समजताच संगीत दिग्दर्शक जीवी प्रकाश यांनी त्याला ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले की, ' एवी अरुण हा माझ्यासाठी मित्र आणि भावासारखा होता. त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे'.


तरुण दिग्दर्शकाचे निधन झाल्यामुळे तमीळ सिनेइंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. एवी अरुणच्या चाहत्यांनाही त्याच्या निधनाने धक्का बसला असून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांच्यासोबतच एवी अरुणने काम केले होते. २०१६पासून त्याने चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी सुरुवात केली होती. हाच त्याचा '4जी' चित्रपट प्रदर्शित होणार होता. काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडथळे येत होते. आता हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर असताना आता एवी अरुण या जगात नाही.

Web Title: Director AV Arun passed away before the release of the first film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.