ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर का होतोय व्हायरल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 10:25 AM2017-06-24T10:25:48+5:302017-06-24T15:57:16+5:30

बॉलिवूडचे लिजेंड दिलीपकुमार यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याच्या बातम्या सातत्याने माध्यमांमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या ...

Dilip Kumar's 'Ha' Photo on Tragadi King Social Media Why Viral Is? | ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर का होतोय व्हायरल?

ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर का होतोय व्हायरल?

googlenewsNext
लिवूडचे लिजेंड दिलीपकुमार यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याच्या बातम्या सातत्याने माध्यमांमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यास आतुर झाले आहेत. अशात दिलीपसाहब यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. वास्तविक हे फोटो दिलीपसाहब यांनीच शेअर केले असून, चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची माहिती देणे हा त्यामागचा हेतू आहे. फोटोंमध्ये भलेही दिलीपकुमार यांची प्रकृती कमजोर दिसत असली तरी, त्यांच्या चाहत्यांना एकप्रकारची ही खुशखबरच म्हणावी लागेल. कारण दिलीपसाहब यांची प्रकृती गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ठिकठाक वाटत आहे. सोशल मीडियावर त्यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यात ते नवी पॅण्ट आणि नवे शर्ट परिधान करून दिसत आहेत. 

वास्तविक, दिलीपसाहब नवा पॅण्ट आणि नवा शर्ट त्यांच्या पत्नी शायरा बानो यांना दाखवित आहेत. ज्यामध्ये ते खूपच हॅण्डसम दिसत आहेत. या फोटोवरून हेही सिद्ध होत आहे की, दिलीपसाहब यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. दिलीपकुमार यांचा आणखी एक फोटो समोर आला असून, त्यामध्ये ते लंच करताना दिसत आहेत. हे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांमध्येदेखील या फोटोंवरून चर्चा रंगत आहे. दिलीपकुमार यांची प्रकृती ठिकठिक असल्याची बातमी त्यांच्याकरिता खरोखरच चांगली म्हणावी लागेल. }}}} ">And this was clicked in the afternoon after lunch. Green tea ka mazaa. pic.twitter.com/hIdhfWLbdt— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 23, 2017बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दिलीपसाहब यांना ‘ट्रॅजेडी किंग’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या चित्रपट करिअरची सुरुवात १९४४ मध्ये केली होती. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपट सुष्टीचा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 

Web Title: Dilip Kumar's 'Ha' Photo on Tragadi King Social Media Why Viral Is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.