‘बॉलिवूडमध्ये डेब्यू करणं कठीण’ - सायेशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 15:52 IST2016-10-29T15:52:31+5:302016-10-29T15:52:31+5:30

जिचे  गुड लुक्स आणि उत्तम अभिनय आपण नुकतेच रिलीज झालेल्या ‘शिवाय’ मधून पाहत आहोत, अशी नवोदित अभिनेत्री सायेशा सेहगल. ...

'Difficult to debut in Bollywood' - Saihaa | ‘बॉलिवूडमध्ये डेब्यू करणं कठीण’ - सायेशा

‘बॉलिवूडमध्ये डेब्यू करणं कठीण’ - सायेशा

चे  गुड लुक्स आणि उत्तम अभिनय आपण नुकतेच रिलीज झालेल्या ‘शिवाय’ मधून पाहत आहोत, अशी नवोदित अभिनेत्री सायेशा सेहगल. तिचा हा पहिलाच चित्रपट असल्याने ती चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो म्हणून प्रचंड नर्व्हस होती. 

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासंदर्भात ती म्हणते,‘बॉलिवूडमध्ये डेब्यू करणं हे अत्यंत कठीण. एवढंच नव्हे तर अजय देवगन सारख्या कलाकारासोबत डेब्यू चित्रपट करणं त्यापेक्षाही जास्त अवघड आहे. लोकांना माझं काम आवडावं असं मला वाटतं. मी अद्याप चित्रपट पाहिला नाही पण मला उत्सुकता नक्कीच लागलीय. माझ्यासाठी हे काम सुदैवाने मिळाले कारण इंडस्ट्रीत काम करणं अत्यंत कठीण आहे. ’ 

पोलिश अभिनेत्री एरिका कार ही देखील या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू करत आहे. सायेशा ही सायरा बानूची नात आहे. त्यामुळे तिला स्पर्धेची भीती कशी असेल? नाही का?

Web Title: 'Difficult to debut in Bollywood' - Saihaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.