​गोविंदा आणि रवीना टंडन यांचा किसी डिस्को में जाये गाण्यावरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 10:51 IST2017-03-15T05:20:03+5:302017-03-15T10:51:18+5:30

गोविंदा आणि रवीना टंडन ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध जोडी होती. त्यांनी दुल्हे राजा, राजाजी, अखियों से गोली मारे, अनारी ...

Did you watch a video of Govinda and Raveena Tandon going to a disco? | ​गोविंदा आणि रवीना टंडन यांचा किसी डिस्को में जाये गाण्यावरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

​गोविंदा आणि रवीना टंडन यांचा किसी डिस्को में जाये गाण्यावरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

विंदा आणि रवीना टंडन ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध जोडी होती. त्यांनी दुल्हे राजा, राजाजी, अखियों से गोली मारे, अनारी नं.1, बडे मियाँ छोटे मियाँ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते दोघे तब्बल 11 वर्षांनंतर नुकतेच एकत्र आले होते. झी सिने अॅवॉर्डमध्ये त्या दोघांनी जोडीने परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सच्या आधीचा एक धमाल व्हिडिओ नुकताच रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किसी डिस्को में जाये या गाण्यावरील सिग्निचर स्टेप ते दोघे परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहेत. या गाण्यात जे तितके उत्साहाने नाचले होते आजही त्यांच्यातील उत्साह थोडादेखील कमी झालेला नाही. त्यांची जोडी आजही तितकीच ताजीतवानी दिसत आहे.  
रवीनाने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की, 2017च्या झी सिने अॅवॉर्डस सोहळ्यात किसी डिस्को में जाए या गाण्यावर आम्ही परफॉर्मन्स सादर करणार असून शेवटच्या क्षणी बॅकस्टेजला आम्ही रिहर्सल करत आहोत. खूपच चांगला वेळ हिरो नं 1 गोविंदासोबत मी घालवत असून खूप मजा येत आहे. 
2006ला प्रदर्शित झालेल्या सँडविज या चित्रपटात त्या दोघांनी काम केले होते. त्यानंतर त्या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकलीच नाही. आता ते दोघे पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने 11 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. 
रवीनाने हा व्हिडिओ शेअर केल्यापासून अनेकांनी तो पाहिला आहे. तसेच त्याच्यावर अनेक लाइक्स आणि कमेंट्सदेखील येत आहेत. अनेकांनी रवीनाची ही पोस्ट रिट्वीटदेखील केली आहे. 

   

Web Title: Did you watch a video of Govinda and Raveena Tandon going to a disco?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.