सनी लिओनीच्या वहिनीला पाहिलंत का?, ग्लॅमरसच्या बाबतीत अभिनेत्रीलाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:39 PM2021-06-02T17:39:12+5:302021-06-02T17:39:33+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची वहिनी खूप स्टायलिश आहे.

Did you see Sunny Leone's daughter-in-law? | सनी लिओनीच्या वहिनीला पाहिलंत का?, ग्लॅमरसच्या बाबतीत अभिनेत्रीलाही देते टक्कर

सनी लिओनीच्या वहिनीला पाहिलंत का?, ग्लॅमरसच्या बाबतीत अभिनेत्रीलाही देते टक्कर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या ग्लॅमरस आणि सौंदर्याच्या चर्चा सगळीकडे होताना दिसते. मात्र तिची वहिनी करिश्मा नायडू वोहरादेखील ग्लॅमरस आणि सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही. करिश्मा नायडू वोहरा खूप स्टायलिश आहे आणि आपल्या फॅशन सेन्समुळे ती नेहमी चर्चेत येत असते. सनी लिओनीला आणखी सुंदर बनवण्यामागे तिच्या वहिनीचाच हात आहे.


सनी लिओनीची वहिनी करिश्मा खूप स्टायलिश आहे आणि ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. यासोबतच सनीच्या वहिनीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. करिश्माचे इंस्टाग्रामवर ४० हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.


करिश्माला वोहरा हे आडनाव संदीप वोहरा सोबत लग्न केल्यानंतर मिळाला आहे. त्यापूर्वी तिचे आडनाव नायडू होते. ती साउथ इंडियन फॅमिलीत लहानाची मोठी झाली आहे. मात्र तिने अल्पावधीतच पंजाबी फॅमिलीत आपले स्थान निर्माण केले आहे.


करिश्मा एक फॅशन स्टायलिस्ट आणि वॉर्डरॉब कन्सल्टेंट म्हणून कार्यरत आहे. सनीच्या भावासोबत लग्न केल्यानंतर ती सनी लिओनीची स्टायलिस्ट म्हणून काम करते आहे. सनी लिओनीचा भाऊ संदीप कॅलिफोर्नियातील एका पबमध्ये शेफ म्हणून काम करतो.

करिश्मा व संदीप नेहमी सनीच्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसतात. मात्र सनीचे चाहत्यांमध्ये इंस्टाग्रामवर तिच्या वहिनीचीदेखील चर्चा ऐकायला मिळते.


सध्या सनी लिओनीची वहिनी करिश्मा प्रेग्नेंट आहे आणि सध्या ती प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. ती यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते.


करिश्मा सनीसारखी फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे तिची फिगर बऱ्याचदा सोशल मीडियावर फ्लॉन्ट करताना दिसते. 

Web Title: Did you see Sunny Leone's daughter-in-law?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.