सुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 16:01 IST2018-05-27T10:02:53+5:302018-05-27T16:01:31+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने तिच्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला असून, त्यास यूजर्सकडून तुफान प्रसिद्धी मिळत आहे.

Did you see Sunidhi Chauhan's son's photo? | सुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय?

सुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय?

लिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान हिनी आपल्या मुलाचा पहिला फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. सुनिधीने १ जानेवारी २०१८ रोजी एक गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर चार महिन्यांनी तिने आपल्या चाहत्यांसाठी मुलाचा फोटो पहिल्यांदा शेअर केला आहे. फोटोमुळे माय-लेकाची जोडी बघण्यासारखी आहे. फोटोमध्ये सुनिधी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे, तर आईच्या कडेवर असलेल्या मुलाने क्यूट पोज दिली आहे. सुनिधीने हा फोटो शेअर करताच केवळ अर्ध्या तासांतच त्यास १४ हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि शेकडो कॉमेण्ट्स मिळाल्या आहेत. 

दरम्यान, ३४ वर्षीय सुनिधीने २४ एप्रिल २०१२ रोजी आपल्या लहानपणीचा मित्र आणि संगीत दिग्दर्शक हितेश सोनिक याच्याशी लग्न  केले होते. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये सोमवार या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुनिधीने मुलाला जन्म दिला होता. 
 

सुनिधीचे हे दुसरे लग्न असून, पहिले लग्न २००२ मध्ये तिने वयाच्या १८व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खान याच्याशी केले होते. या लग्नासाठी तिच्या घरच्यांचा विरोध होता. परंतु अशातही सुनिधीने बॉबीबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नाही. वर्षभरातच म्हणजे २००३ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. बॉबीशी घटस्फोट घेतल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी सुनिधी लग्नाच्या बंधनात अडकली. 

Web Title: Did you see Sunidhi Chauhan's son's photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.