​ छोट्या तैमूर अली खानचा हा नवाबी थाट तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 10:44 IST2017-05-09T05:14:25+5:302017-05-09T10:44:25+5:30

कालपासून करिना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा लाडका मुलगा छोटा नवाब तैमूर अली खान चा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील तैमूरचा नवाबी थाट पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल.

Did you see the small timur Ali Khan's newbie? | ​ छोट्या तैमूर अली खानचा हा नवाबी थाट तुम्ही पाहिलातं?

​ छोट्या तैमूर अली खानचा हा नवाबी थाट तुम्ही पाहिलातं?

िना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा लाडका मुलगा छोटा नवाब तैमूर अली खान कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. म्हणूनच तर सोशल मीडियावर तैमूर आला रे आला की, सगळे आनंदीत होतात. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. कालपासून तैमूरचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील तैमूरचा नवाबी थाट पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. ‘इन्सटण्ट बॉलिवूड’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचा हा फोटो पोस्ट केला आहे.  



डोक्यावर टोपी घालून बाबागाडीत बसलेल्या या छोट्या तैमूरचा थाट कुठल्या नवाबापेक्षा कमी नाही. पांढºया रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स अशा वेशात तैमूर खूप गोड दिसतो आहे आणि त्याची कॅप ती तर ‘काबीले तारिफ’आहेच. करिना व सैफच्या या छोट्या नवाबाची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हाही चाहत्यांनी तैमूरच्या फोटोला पसंती दिली होती. आता ही तैमूरच्या या फोटोला भरभरून लाईक्स मिळत आहेत. या महिन्याच्या २० तारखेला तैमूर पाच महिन्यांचा होणार आहे.
तैमूर या फोटोत ज्या बाबागाडीत अर्थात स्ट्रालरमध्ये बसला आहे, तेही विशेष आहे. होय, तैमूर मॅकलेरेनच्या स्ट्रालरमध्ये बसला आहे. या स्ट्रालरची किंमत ऐकाल तर तुम्ही दंग व्हाल. होय, या स्ट्रालरची किंमत २० हजारांपासून २५ हजारांपर्यंत आहे. तैमूरसाठी निश्चितपणे ही एक शानदार सवारी आहे आणि का नसावी, शेवटी तो नवाब पतौडी घराण्याचा वारस जो आहे. तैमूरचा हा फोटो कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा!

Web Title: Did you see the small timur Ali Khan's newbie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.