​एम.एस धोनीची पहिली प्रेयसी प्रियांका झाचा फोटो तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 14:02 IST2017-06-23T08:26:41+5:302017-06-23T14:02:26+5:30

एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात प्रेक्षकांना धोनीच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. धोनीच्या क्रिकेट करियरविषयी ...

Did you see the photo of MS Dhoni's first beloved Priyanka Chopra? | ​एम.एस धोनीची पहिली प्रेयसी प्रियांका झाचा फोटो तुम्ही पाहिलात का?

​एम.एस धोनीची पहिली प्रेयसी प्रियांका झाचा फोटो तुम्ही पाहिलात का?

एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात प्रेक्षकांना धोनीच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. धोनीच्या क्रिकेट करियरविषयी तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी या चित्रपटाच्या आधी कोणालाच काही माहीत नव्हते. पण या चित्रपटामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या आहेत. 
एम एस धोनीचे साक्षीशी लग्न झाले असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. पण साक्षीशी लग्न करण्याआधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. या मुलीविषयी आपल्याला एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे कळले आहे. या मुलीचे नाव प्रियांका झा असून धोनी आणि तिची ओळख विमानात झाली होती. पहिल्या ओळखीत धोनी हा एक क्रिकेटर असल्याची देखील तिला कल्पना नव्हती. प्रियाकांशी भेट झाली त्यावेळी धोनी एक क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध नव्हता. पण प्रियांका आयुष्यात आली आणि त्याचे आयुष्यच बदलले. एक क्रिकेटर म्हणून त्याने आपले प्रस्थ निर्माण केले. धोनी त्याच्या खेळात कितीही व्यग्र असला तरी तो आवर्जून प्रियांकाला वेळ द्यायचा. धोनीच्या प्रत्येक निर्णयात, त्याच्या खडतर वेळेत प्रियांका त्याच्या पाठीशी उभी राहायची. 
प्रियांका आणि धोनी त्यांच्या नात्याबाबत खूप सिरियस होते. भविष्यात लग्न करण्याचा देखील त्यांचा विचार होता. पण धोनी भारतासाठी मॅच खेळण्यासाठी परदेशात गेला असता प्रियांकाचा कार अपघातात मृत्यू झाला. धोनीला ही गोष्ट अनेक दिवसांनंतर भारतात आल्यावर कळली. त्याला प्रियांकाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्याला चांगलाच धक्का बसला होता. तो अनेक महिने डिप्रेशनमध्ये होता. पण त्याने एक प्रसिद्ध क्रिकेटर बनावे अशी प्रियांकाची इच्छा असल्याने त्याने दुःख विसरून सगळे लक्ष क्रिकेटकडे दिले. 
एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात दिशा पटानीने प्रियांकाची व्यक्तिरेखा साकारली होती. पण खऱ्या आय़ुष्यात प्रियांका कशी दिसते हे खूपच कमी जणांना माहीत आहे. प्रियांकाचा धोनीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ms dhoni priyanka jha

Web Title: Did you see the photo of MS Dhoni's first beloved Priyanka Chopra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.