डिम्पी गांगुलीच्या चिमुकलीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 14:18 IST2017-01-27T08:48:12+5:302017-01-27T14:18:12+5:30

मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सेलिब्रिटी प्रचंड काळली घेतात. पण जेव्हा-केव्हा सेलिब्रिटी आपल्या मुलांचे फोटो शेअर करतात,तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यावर खिळतात. डिम्पी गांगुली हिची मुलगी रिआना हिचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.

Did you see this photo of Dimpy Ganguly's Tiger? | डिम्पी गांगुलीच्या चिमुकलीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?

डिम्पी गांगुलीच्या चिमुकलीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?

 
ुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सेलिब्रिटी प्रचंड काळली घेतात. पण जेव्हा-केव्हा सेलिब्रिटी आपल्या मुलांचे फोटो शेअर करतात,तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यावर खिळतात. डिम्पी गांगुली हिची मुलगी रिआना हिचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.













डिम्पीने रिआनाचे वेगवेगळे फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. रिआनाच्या जन्मानंतर काही काळ डिम्पीने तिला जगापासून लपवून ठवेल. मात्र अलीकडे डिम्पी रिआनाचे फोटो अगदी बिनधास्तपणे शेअर करताना दिसतेय. रिआनाचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा!
राहुल महाजनशी घटस्फोट घेतल्यानंतर डिम्पीने सन २०१५च्या नोव्हेंबरमध्ये बिझनसेमॅन रोहित रॉय याच्यासोबत लग्न केले होते. यानंतर जूनमध्ये रिआनाचा जन्म झाला. त्यामुळे डिम्पी या लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती.
सन २०१० मध्ये ‘राहुल दुल्हनियां ले जायेंगे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये डिम्पीने राहुल महाजनशी लग्न केले होते. या हायप्रोफाईल लग्नानंतर डिम्पी अचानक चर्चेत आली होती. पण हे लग्न फार काळ चालले नाही. तीनच वर्षांत हे नाते तुटले. डिम्पीने राहुल महाजनवर मारपीट आणि घरगुती हिंसाचाराचा आरोपही लावला होता. राहुल हा भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आहे. राहुलवर काही वर्षांपूर्वी ड्रग्ज घेतल्याचा आरोपही लावला गेला होता.
यादरम्यान डिम्पी ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या आठव्या सीझनमध्येही दिसली होती. या शोमध्ये एका सीक्वेंसअंतर्गत राहुल महाजनचीही एन्ट्री झाली होती. यावेळी दोघांमध्ये बरीच जवळीक दिसून आली होती. ‘बिग बॉस’शिवाय ‘जोर का झटका: टोटल वाईपआऊट,’‘नच बलिये5’,‘बाजी मेहमान नवाजी की’ या रिअ‍ॅलिटीशोमध्येही डिम्पी दिसली होती.

Web Title: Did you see this photo of Dimpy Ganguly's Tiger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.