तुम्ही पाहिलेत का सेलेब्सचे ‘मॉर्निंग सेल्फीज’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 16:25 IST2017-07-04T10:55:00+5:302017-07-04T16:25:00+5:30
अबोली कुलकर्णी सेल्फी आणि फोटो यातील कोणता प्रकार आवडतो ? विचाराल तर साहजिकच उत्तर सेल्फी असंच मिळणार आहे. अहो, ...
.jpg)
तुम्ही पाहिलेत का सेलेब्सचे ‘मॉर्निंग सेल्फीज’!
सेल्फी आणि फोटो यातील कोणता प्रकार आवडतो ? विचाराल तर साहजिकच उत्तर सेल्फी असंच मिळणार आहे. अहो, सेल्फीचा जमाना आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सेल्फी काढण्यावरच आपला जास्त भर असतो. आपण दिवसभरातले अनेक सेल्फीज आपल्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर करत असतो. अशीच काहीशी सवय आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना देखील आहे. सेलिब्रिटी हे सकाळचे सेल्फीज काढून ते त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पाहूयात मग, कोणकोण आहेत हे स्टार्स ज्यांच्यामध्ये ‘मॉर्निंग सेल्फीज’चा फिव्हर आहे.
* आलिया भट्ट
बॉलिवूडची चुलबूली गर्ल म्हणून आलिया भट्ट हिच्याकडे पाहिले जाते. ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटानंतर ती आता ‘राझी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘कोणत्याही सुपरस्टाराशिवाय मी माझे करिअर घडवू शकते.’ या तिच्या वक्तव्यामुळे ती बॉलिवूडमध्ये खूपच खंबीर झाल्याचे दिसून येत आहे. पण, तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडमध्ये खंबीर असलेली आलिया तिच्या घरी कशी असते? तर एकदम कूल. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणं तिला प्रचंड आवडतं. त्यामुळे ती देखील इतरांप्रमाणेच तिचा मॉर्निंग सेल्फी सोशल साईटवर शेअर करत असते.
* अनुष्का शर्मा
बॉलिवूडच्या बिनधास्त आणि बोल्ड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा हिच्याकडे पाहिले जाते. पण, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात तेवढीच रिलॅक्स आणि कूल आहे. ती देखील अधूनमधून तिचे मॉर्निंग सेल्फीज तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
* जॅकलीन फर्नांडिस
बॉलिवूडची श्रीलंकन ब्युटी म्हणून जॅकलीन फर्नांडिस हिच्याकडे पाहिले जाते. सर्वप्रथम ज्या अभिनेत्रीला हिंदीमध्ये व्यवस्थित बोलता येत नव्हते अशी ती जॅकलीन आता हिंदी चित्रपटांमधून सर्रासपणे काम करताना दिसतेय. सध्या ती ‘जुडवा २’ च्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैयक्तिक आयुष्यात ती खुपच चुलबुली आहे. ती सातत्याने तिचे सेल्फीज पोस्ट करत असते. पण, तिचा मॉर्निंग सेल्फी पहावा असा नक्कीच आहे.
* कॅटरिना कैफ
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच कॅटरिना कैफ. ती दोन बाबतीत फारच स्ट्रिक्ट आहे ते म्हणजे तिची झोप आणि तिचा व्यायाम. कॅट खुप वर्षांनंतर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली. त्यामुळे तिला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे सर्व फोटो अकाऊंटवर पोस्ट करण्याची सवय लागली. आता ती तिचे मॉर्निंग सेल्फीज, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
* श्रद्धा कपूर
कोणतीही व्यक्तीरेखा मिळाल्यानंतर तिच्यासाठी सर्वार्थाने मेहनत घेणारी आणि अपार कष्ट घेणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. ती सध्या ‘हसीना’ या बायोपिकसाठी चर्चेत आहे. ती नेहमी ही व्यक्तिरेखा आपल्याला किती प्रसिद्धी मिळवून देणार आणि या व्यक्तिरेखेत काय वेगळेपणा आहे? या सर्व गोष्टींचा विचार करूनच मग ती भूमिका स्विकारते. अशी मेहनती अभिनेत्री तिचे वैयक्तिक आयुष्य किती एन्जॉय करते? हे ती पोस्ट करत असलेल्या मॉर्निंग फोटोजवरूनच समजते.
* परिणीती चोप्रा
बॉलिवूडची चुलबुली गर्ल म्हणून आपण परिणीतीला ओळखतो. तिने तिचे वजन घटवल्यापासून खूपच क्यूट दिसत असल्याचे आपण पाहतो. ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चित्रपटाचे प्रमोशन, इव्हेंट्स यांच्याद्वारे ती स्वत:चे फोटोसेशन साईटवर अपलोड करत असते. ती मॉर्निंग सेल्फी देखील तिच्या अकाऊंटवर पोस्ट करते.