Janhvi Kapoorचं चेन्नईतील घर पाहिलंत का? अभिनेत्रीनं शेअर केला घराचा INSIDE VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:30 IST2022-11-17T17:30:23+5:302022-11-17T17:30:56+5:30
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने श्रीदेवीच्या पहिल्या प्रॉपर्टीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो व्हायरल होतो आहे.

Janhvi Kapoorचं चेन्नईतील घर पाहिलंत का? अभिनेत्रीनं शेअर केला घराचा INSIDE VIDEO
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठीही इंडस्ट्रीत ओळखली जाते. जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, आता जान्हवीच्या चेन्नईतील संपूर्ण घराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्वतः तिच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याची चाहत्यांना ओळख करून देत आहे.
खरेतर, 'वोग'ने यूट्यूबवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, जो जान्हवी कपूरच्या चेन्नईतील घराचा आहे. या आतल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री चाहत्यांना तिचे घर दाखवताना दिसते आहे. यासोबतच ती तिच्या घराशी संबंधित गोष्टीही सांगताना दिसत आहे. यादरम्यान जान्हवी सांगते की, आई श्रीदेवीने बनवलेली ही पहिली प्रॉपर्टी आहे. यासोबतच जान्हवीने तिची दिवंगत आई श्रीदेवीने केलेले पहिले पेटिंग देखील दाखवले आहे, जे खूप खास आहे.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सध्या ती तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार रावही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री नितेश दिग्दर्शित 'बवाल' या चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे. त्याचवेळी जान्हवी नुकतीच 'मिली' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्यांच्याशिवाय इतर अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा 2019 च्या सुपरहिट मल्याळम चित्रपट हेलनचा रिमेक आहे.