अलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 06:14 PM2019-02-25T18:14:27+5:302019-02-25T18:21:22+5:30

अलिया भटला बॉलिवूडमध्ये पदर्पण करून केवळ काहीच वर्षं झाली आहेत. पण आज तिने बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुडंट ऑफ द इयर या पहिल्याच चित्रपटापासूनच तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली आहे.

Did you see alia bhatt vanity van pictures? | अलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

अलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

googlenewsNext
ठळक मुद्देअलिया भटने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहाता तिची व्हॅनिटी व्हॅन किती आलिशान आहे हे लक्षात येत आहे. एखाद्या मोठाल्या घराप्रमाणेच ही व्हॅनिटी व्हॅन असून सगळ्या अत्याधुनिक सुविधा यात आहेत. एवढेच नव्हे तर या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अलियाला झोपण्यासाठी एक पलंग असून या पलंगाच्या मागे एक छानसे बगळ्याचे चित्र काढण्यात आलेले आहे.

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडत आहे. आपला आवडता कलाकार कोणाच्या प्रेमात पडला आहे, कुठे फिरायला गेला आहे हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूपच आवडते. सध्याच्या काळात अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपले खासगी फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांचे चाहते देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॉलो करतात.

अलिया भटला बॉलिवूडमध्ये पदर्पण करून केवळ काहीच वर्षं झाली आहेत. पण आज तिने बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुडंट ऑफ द इयर या पहिल्याच चित्रपटापासूनच तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली आहे. तिने आजवर अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हायवे, राजी यांसारख्या चित्रपटामधील तिच्या भूमिकांचे तर विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या तिचा गली बॉय हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका देखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटानंतर ती आता ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिने तिच्या चाहत्यांसाठी काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

आपल्या आवडत्या कलाकाराची व्हॅनिटी व्हॅन कशी आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांची नक्कीच इच्छा असते. अलिया भटने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहाता तिची व्हॅनिटी व्हॅन किती आलिशान आहे हे लक्षात येत आहे. 

एखाद्या मोठाल्या घराप्रमाणेच ही व्हॅनिटी व्हॅन असून सगळ्या अत्याधुनिक सुविधा यात आहेत. एवढेच नव्हे तर या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अलियाला झोपण्यासाठी एक पलंग असून या पलंगाच्या मागे एक छानसे बगळ्याचे चित्र काढण्यात आलेले आहे.

ब्रम्हास्त्र या चित्रपटात आलियासोबतच रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.  

Web Title: Did you see alia bhatt vanity van pictures?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.