'या' बॉलिवूड कपल्सनी वेगळे झाल्यानंतर ही घेतला नाही घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 16:45 IST2017-07-11T11:15:36+5:302017-07-11T16:45:36+5:30
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे चित्रपटाच्या सेटवर सूत जमले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांचे नाते फारकाळ काही ...

'या' बॉलिवूड कपल्सनी वेगळे झाल्यानंतर ही घेतला नाही घटस्फोट
ब लिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे चित्रपटाच्या सेटवर सूत जमले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांचे नाते फारकाळ काही टिकले नाही. मात्र अनेक वर्ष वेगळे राहिल्यानंतर ही या जोड्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला नाही. नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर.
रणधीर कपूर-बबिता
सत्तराच्या दशकातील सर्वांत रोमाँटिक जोड्यांपैकी एक जोडी होती रणधीर कपूर आणि बबिताची. चित्रपट कल आज और कलच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कपूर घराण्याला चित्रपटात काम करणारी सून पसंत नव्हती म्हणून रणधीर कपूर यांच्या घरातून या लग्नाला विरोध झाला. मात्र त्यानंतरही रणधीर कपूर यांनी बबिताशीच विवाह केला. करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोन मुलींच्या जन्मानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष लांब राहिल्यानंतरही त्यांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. नुकत्याच बबिताच्या 70व्या वाढदिवसाला ही रणधीर कपूर हजर होते.
![]()
राखी- गुलजार
सत्तरीच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून राखीचे नावं घेतले जायचे. राखीचा पहिला विवाह अजय बिस्वास या निर्मात्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राखीच्या आयुष्यात गुलजार आले आणि त्यांच्यासोबत तिने लग्न केले. कालांतराने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला जेव्हा गुलजार यांनी त्यांच्या मौसम चित्रपटात राखीला न घेता शर्मिला टागोरला घेतले, आणि त्याचवेळेस राखीने यश चोप्रांचा कभी कभी चित्रपट स्वीकारला जे गुलजारला यांना मान्य नव्हते. ते वेगळे झाले खरे पण त्यांनी त्यांच्या मुलीच्या भवितव्यासाठी घटस्फोट घेतला नाही.
संगीता बिजलानी - मोहम्मद अजहरुद्दीन
अजहरुद्दीन पहिल्याच नजरेत संगीता आवडली होती. संगीता बिजलानी ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री होती. संगीतासाठी अजहरने आपला 9 वर्षांचा संसार मोडला. त्यावेळी त्याला त्याची पहिली पत्नी नौरीनपासून 2 मुली ही होत्या. तरीही अजरने 1996 मध्ये संगीताशी विवाह केला. लग्नाच्या 15 वर्षांनंतर संगीता आणि अजहर वेगळे झाले. ज्वाला गुट्टा आणि अजहरमधली वाढत्या जवळीकीमुळे संगीता अजहरपासून लांब गेल्याचे समजतेय मात्र वेगळे होऊन ही दोघांनी अजूनही घटस्फोट घेतलेला नाही.
![]()
कोंकणा सेन शर्मा - रणवीर शेरॉय
2007मध्ये डबल मिक्स या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस दोघांचे सूत जुळले. त्यानंतर पुढील वर्षातच त्यांनी साखरपुडा केला आणि दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली याचदरम्यान त्यांना एक मुलगादेखील झाला. पण यांचे ही नातं फार काळ टिकले नाही. 2013च्या सुमारास दोघे वेगळे झाल्याची बातमी मीडियामध्ये पसरली मात्र ही केवळ अफवा असल्याचे दोघांनी सांगितले. पण शेवटी 2015मध्ये त्यांनी आपण वेगळे झाल्याचे कबूल केलेच. ते आज ही एक चांगले मित्र आहेत मागच्या वर्षी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
![]()
पुलकित सम्राट - श्वेता रोहिरा
पुलकितने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा बरोबर नोव्हेंबर 2014मध्ये विवाह केला. पण त्यांचे हे नातं लग्नानंतर एका वर्षातच संपुष्टात आले. त्याचे कारण होते पुलकितची सहकलाकार यामी गौतम. पुलकित आणि यामी 'सनम रे' च्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करत होते.