​जॉन अब्राहमच्या अ‍ॅक्शनपटात डायना पेंटीची वर्णी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 15:18 IST2017-05-07T09:48:00+5:302017-05-07T15:18:00+5:30

डायना पेंटी लवकरच बॉलिवडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. होय, जॉनने त्याच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनणा-या चित्रपटासाठी डायना पेंटीशी ...

Diana Panti narrative in John Abraham's action | ​जॉन अब्राहमच्या अ‍ॅक्शनपटात डायना पेंटीची वर्णी!

​जॉन अब्राहमच्या अ‍ॅक्शनपटात डायना पेंटीची वर्णी!

यना पेंटी लवकरच बॉलिवडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. होय, जॉनने त्याच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनणा-या चित्रपटासाठी डायना पेंटीशी संपर्क साधला आहे. ‘शांतीवन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. भारताने केलेल्या पोखरण आण्विक चाचणीवर आधारित या चित्रपटात धमाकेदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. याच अ‍ॅक्शन चित्रपटात डायनाची वर्णी लागली आहे. डायनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी स्क्रिप्ट वाचली आणि लगेच चित्रपट साईन केला, असे तिने सांगितले.

पोखरण आाण्विक चावणीबद्दल प्रत्येकजण जाणू इच्छितो. त्यामुळेच या चित्रपटाकडे केवळ जॉनचे चाहतेच नाही तर सगळेच सिनेप्रेमी डोळे लावून बसले आहेत. ‘नीरजा’च्या लेखकांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. येत्या ३० तारखेपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे.
डायनाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तिचा ‘लखनौ सेंट्रल’ हा सिनेमा येतो आहे. यात फरहान अख्तर, मनोज तिवारी व गिप्पी ग्रेवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

लखनौ सेंट्रल हा चित्रपट रणजित तिवारी हे दिग्दर्शित करीत असून, हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. संगीताची गोडी असणाºया दोघांची जेलमध्ये भेट होते आणि सामाजिक संस्थेला मदत करण्यासाठी ते बँडची स्थापना करतात असा या चित्रपटाचा विषय आहे. अलीकडे डायनाचा ‘हॅपी भाग जायेगी’ हा सिनेमा आला होता. यातील डायनाच्या अभिनयाची समीक्षकांनी जोरदार प्रशंसा केली होती. यात अभय देओल आणि अली फजल हे दोघे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘हॅपी भाग जायेगी2’ लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दुसºया भागातही हॅपीच्या भूमिकेत डायनाच दिसणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Diana Panti narrative in John Abraham's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.