बॉलिवूडमध्ये नाही तर साउथच्या सिनेइंडस्ट्रीत धोनीची एंट्री, चित्रपटाची करणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:58 IST2022-10-25T17:55:54+5:302022-10-25T17:58:12+5:30
MS Dhoni : 'धोनी एण्टरटेनमेंट' तामिळ भाषेतील पहिला चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाची संकल्पना साक्षी सिंग धोनीची आहे.

बॉलिवूडमध्ये नाही तर साउथच्या सिनेइंडस्ट्रीत धोनीची एंट्री, चित्रपटाची करणार निर्मिती
क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी यांचा चित्रपट प्रॉडक्शन हाऊस तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धोनी एण्टरटेनमेंट' तामिळ भाषेतील पहिला चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाची संकल्पना साक्षी सिंग धोनीची आहे, जी प्रोडक्शन हाऊसची व्यवस्थापकीय संचालक आहे. 'अथर्व - द ओरिजिन'चे लेखक रमेश थमिलमणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. थमिलमणीने सांगितले की, “मी साक्षीने लिहिलेली संकल्पना वाचली. मला माहित होते की ते विशेष आहे. ही संकल्पना नवीन आहे आणि त्यात एक मजेदार कौटुंबिक मनोरंजन होण्याची सर्व क्षमता आहे."
तमिळ व्यतिरिक्त, धोनी एंटरटेनमेंट अनेक चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखकांसोबत विज्ञान कथा, क्राईम ड्रामा, कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर यासह इतर शैलींमध्ये रोमांचक आणि आकर्षक सामग्री तयार करण्यासाठी चर्चा करत आहे.