​धनुष म्हणतो, ‘ते’ मला ब्लॅकमेल करत आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:43 IST2017-01-27T12:13:10+5:302017-01-27T17:43:10+5:30

रजनीकांतचा जावई आणि ‘रांझणा’फेम अभिनेता धनुष अलीकडे चर्चेत आलाय, तो तामिळनाडूतील एका वयोवृद्ध जोडप्यामुळे. या जोडप्याने ते धनुषचे खरे ...

Dhanush says, 'They' are blackmailing me! | ​धनुष म्हणतो, ‘ते’ मला ब्लॅकमेल करत आहेत!

​धनुष म्हणतो, ‘ते’ मला ब्लॅकमेल करत आहेत!

नीकांतचा जावई आणि ‘रांझणा’फेम अभिनेता धनुष अलीकडे चर्चेत आलाय, तो तामिळनाडूतील एका वयोवृद्ध जोडप्यामुळे. या जोडप्याने ते धनुषचे खरे आई-वडिल असल्याचा दावा केला आहे. धनुष यावर काय भूमिका घेतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तर आता धनुषने या जोडप्याविरुद्ध ब्लॅकमेल करत असल्याचा गुन्हा दाखल दाखल केला आहे.


 याच दांम्पत्याने धनुष हा आपलाच मुलगा असल्याचा दावा केला आहे.


कातिरेशन व मीनाक्षी, असे या वृद्ध जोडप्याचे नाव आहे. या दांम्पत्याने धनुषचे काही लहानपणीचे फोटो आणि जन्मतारखेचा दाखला दाखवत, धनुष हा आपलाच मुलगा असल्याचा दावा केला आहे. धनुष हा अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे २००२ साली तो पळून गेला. यानंतर तो धनुष नावाने चित्रपटात काम करू लागला. त्याचे नाव कलाईसेल्वम आहे. त्याने मेलूरमध्ये आर सी हायर सेकेंडीरी स्कूल व गव्हर्नमेंट बॉईज हायर सेकेंडरी स्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. अभिनेता झाल्यानंतर धनुष कधीही आम्हाला भेटायला आला नाही. आम्ही एकदा स्वत: चेन्नईत भेटायला गेलो. पण आम्हाला त्याला भेटू देण्याऐवजी हाकलून लावण्यात आले, असा दावा या दांम्पत्याने केला होता. पण धनुषने या दांम्पत्याचा हा दावा फेटाळून लावला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कृष्णमूर्ति म्हणजेच कस्तुरी राजा आणि विजयलक्ष्मी हेच  माझे खरे आई-वडील असल्याचे धनुषने स्पष्ट केले आहे.  सोबतच चेन्नईतील इगेमोरे येथील सरकारी रुग्णालयामध्ये २८ जुलै १९८३ मध्ये त्याचा जन्म झाल्याचा प्रतिदावाही केला आहे.

ALSO READ : वृद्ध दांम्पत्याने केला दावा; म्हणे धनुष आमचा पळून गेलेला मुलगा!
धनुषचा ‘विसारानाई’ करणार आॅस्कर वारी

  कातिरेशन आणि मीनाक्षी यांनी माझ्या जन्माविषयीचा कुठलाही पुरावा न्यायालयासमोर सादर केला नाहीयं. त्यामुळे   माझा जन्म ७ नोव्हेंबर १९८३ मध्ये झाला होता, हे सिद्ध होऊ शकत नाही.  न्यायालयाने कोणत्याही पुराव्याच्या अभावी फक्त आणि फक्त त्या दाम्पत्याच्या तक्रारीच्या आधारेच मला समन्स पाठवले आहे,असे धनुषने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. धनुष हा चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे, हे सगळेच जाणतात. २००२ मध्ये त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 

Web Title: Dhanush says, 'They' are blackmailing me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.