‘दम लगा के हईशा’ला दोन वर्ष पूर्ण; भूमी पेडनेकरने म्हटले, या सिनेमामुळे आयुष्य बदलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 13:51 IST2017-02-28T08:21:45+5:302017-02-28T13:51:45+5:30

२०१५ मध्ये आलेल्या ‘दम लगा के हईशा’ या सिनेमात संध्या नावाच्या वजनदार मुलीची भूमिका साकारणाºया भूमी पेडनेकरच्या मते, या ...

'Dhamaaaaa Hisaaaaa' is completed two years; Land Pedenekar said, the life of this movie changed! | ‘दम लगा के हईशा’ला दोन वर्ष पूर्ण; भूमी पेडनेकरने म्हटले, या सिनेमामुळे आयुष्य बदलले!

‘दम लगा के हईशा’ला दोन वर्ष पूर्ण; भूमी पेडनेकरने म्हटले, या सिनेमामुळे आयुष्य बदलले!

१५ मध्ये आलेल्या ‘दम लगा के हईशा’ या सिनेमात संध्या नावाच्या वजनदार मुलीची भूमिका साकारणाºया भूमी पेडनेकरच्या मते, या सिनेमामुळे तिचे आयुष्य बदलले आहे. गेल्या सोमवार नॅशनल अवॉर्ड विजेत्या या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त भूमीशी संवाद साधला असता, तिने अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली. 



यावेळी भूमीने शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘माझे आयुष्य बदलणाºया या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. ‘दम लगा के हईशा’ यापेक्षा माझ्यासाठी दुसरे चांगले काही असूच शकत नाही. या सिनेमात लग्नानंतर दोघांमध्ये नसलेल्या प्रेमाची कथा दाखविली होती. ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती, त्यातही भूमीची भूमिका जबरदस्त पसंत केली गेली होती. पुढे आपल्या वेट लॉसवरून भूमी अनेक दिवस चर्चेत होती. 

याच सिनेमातील तिचा सहअभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पुन्हा एकदा ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमात एकत्र बघावयास मिळणार आहेत. कलर्स येलो आणि इरोज इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने प्रोड्यूस होत असलेल्या या सिनेमाचे आर. एस. प्रसन्ना हे दिग्दर्शन करीत आहेत. हा एक रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा आहे. 

2 years to the day my life changed #dumlagakehaisha nothing can be as special as you ❤ @Sharatkatariya@ayushmannk@yrf#2yrsofdlkhpic.twitter.com/EUE5kDH1eA— bhumi pednekar (@psbhumi) February 27, 2017 ">http://

}}}}
याव्यतिरिक्त भूमी अक्षय कुमारसोबत ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ यामध्येही झळकणार आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली असून, दोन जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या या सिनेमामुळे भूमी चांगलीच चर्चेत असून, तिला या सिनेमाकडून बºयाचशा अपेक्षा आहेत. तिच्या मते, हा सिनेमा तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरू शकतो. 

Web Title: 'Dhamaaaaa Hisaaaaa' is completed two years; Land Pedenekar said, the life of this movie changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.