देसी गर्ल प्रियंका चोपडा म्हणते, ‘बॉयफ्रेंड नको गं बाई’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 19:50 IST2017-09-10T14:20:59+5:302017-09-10T19:50:59+5:30

२००३ मध्ये ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या यशाच्या उत्तुंग शिखरावर आहे. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही तिने ...

Desi Girl Priyanka Chopra says, 'Boyfriend does not want to go by!' | देसी गर्ल प्रियंका चोपडा म्हणते, ‘बॉयफ्रेंड नको गं बाई’!

देसी गर्ल प्रियंका चोपडा म्हणते, ‘बॉयफ्रेंड नको गं बाई’!

०३ मध्ये ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या यशाच्या उत्तुंग शिखरावर आहे. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही तिने स्वत:ला सिद्ध केले असून, प्रियंकाच्या यशाचे सर्वांनाच कौतुक आहे. खरं तर ग्लॅमरच्या दुनियेत यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना त्या कलाकाराचे अनेकांशी नाव जोडले जाते. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, लिंकअप, ब्रेकअप हे शब्द पुढे कॉमन होत जातात. परंतु बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा यापासून कोसो दूर आहे. वास्तविक सुुरुवातीला प्रियंकाचे नाव अक्षयकुमार, शाहिद कपूर यांसारख्या बड्या स्टार्सशी जोडले गेले आहे. मात्र त्यानंतर तिने जणूकाही यापासून दूर जाणे पसंत केले आहे. मात्र असे काय घडले असेल की, प्रियंका यापासून दूर जात आहे? याचा खुलासा खुद्द प्रियंका चोपडाने केला आहे. 

एका मुलाखतीत प्रियंकाने म्हटले की, ज्या स्टार्ससोबत माझे नाव जोडले गेले त्या सर्व अफवा आहेत. प्रियंकाच्या मते, तिने अद्यापपर्यंत कोणालाही डेट केले नाही. खरं तर प्रियंकाला बघून यावर विश्वास ठेवणे अवघडच म्हणावे लागेल. परंतु तिने हे पूर्णत: खरं असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर प्रियंकाने हादेखील खुलासा केला की, ‘मला कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये राहायचे नाही. लग्नापर्यंत मी सिंगल लाइफ एन्जॉय करू इच्छिते.’ जेव्हा प्रियंका हे सर्व सांगत होती, तेव्हा ती खूपच कॉन्फिडेंट वाटत होती. 



आता प्रियंकाने असा निर्णय का घेतला असावा, हे जरी कोडे असले तरी तिच्या चाहत्यांना मात्र तिच्या स्वप्नातील राजकुमार जाणून घेण्याची इच्छा नसेल तरच नवल. असो, प्रियंकाच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास, ती एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी अमेरिकेच्या टीव्ही शोमध्ये झळकत आहे. त्याचबरोबर हॉलिवूडमध्येही सध्या ती झेप घेत आहे. वास्तविक प्रियंका तिचे खासगी जीवन इतर अभिनेत्रींच्या तुलनेत अतिशय हटके पद्धतीने जगते. 

वास्तविक प्रियंकाविषयी इंडस्ट्रीमध्ये बºयाचदा अफवा पसरविल्या गेल्या आहेत. अक्षयकुमारसोबतचे तिचे अफेअर एकेकाळी खूपच चर्चिले गेले. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने तर तिला अक्षयपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. आता यात कितपत सत्यता आहे, हे मात्र अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.  

Web Title: Desi Girl Priyanka Chopra says, 'Boyfriend does not want to go by!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.