देसी गर्ल प्रियंका चोपडा आयकर विभागाच्या रडारवर, वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 21:26 IST2018-01-25T15:56:17+5:302018-01-25T21:26:17+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु तिच्या प्रोजेक्टमुळे नाही तर आयकर विभागामुळे ती प्रसिद्धीझोतात ...

Desi Girl Priyanka Chopra, on the income tax department's radar, read what is the episode! | देसी गर्ल प्रियंका चोपडा आयकर विभागाच्या रडारवर, वाचा काय आहे प्रकरण!

देसी गर्ल प्रियंका चोपडा आयकर विभागाच्या रडारवर, वाचा काय आहे प्रकरण!

लिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु तिच्या प्रोजेक्टमुळे नाही तर आयकर विभागामुळे ती प्रसिद्धीझोतात आली आहे. त्याचे झाले असे की, आयकर विभागाने प्रियंकाला मिळालेल्या ६७ लाखांच्या लग्जरी आयटमवर कर भरण्यावरून नोटीस बजावली आहे. परंतु प्रियंकाने या नोटिसीला उत्तर देताना हे लग्जरी आयटम भेट स्वरूपात मिळाले असल्याचे म्हटले आहे. मात्र एक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने प्रियंकाचे हे उत्तर फेटाळून लावले असून, तिला कर भरवाच लागेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या आयकर विभाग अन् प्रियंका चोपडा हा वाद पेटताना दिसत आहे. 

याविषयीची अधिक माहिती अशी की, २०११ मध्ये आयकर विभाग अपीलेट ट्रिब्यूनलने (आयटीएटी) प्रियंका चोपडाच्या घरी छापा मारला होता. तिच्या घरी एक लग्जरी वॉच आणि एक लग्जरी कार मिळाली होती. ज्याचा कर तिने भरला नव्हता. याविषयी प्रियंकाचे म्हणणे होते की, ज्या कंपनीला तिने एंडोर्स केले होते, त्याच कंपनीने तिला प्रमोशनल गिफ्ट म्हणून लग्जरी वॉच आणि कार दिली होती. मात्र आयकर विभागाच्या मते, आयकर कर कायद्याच्या कलम २५ (५) नुसार लग्जरी गिफ्टवर कर भरावाच लागेल. 



दरम्यान प्रियंकाच्या घरात मिळून आलेली वॉच एलव्हीएमएच-टॅग कंपनीची असून, तिची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी आहे. तर टोयोटा कंपनीच्या कारची किंमत २७ लाख इतकी आहे. आता हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्याने प्रियंका कर भरणार की आणखी या प्रकरणाला वेगळे वळण येणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Desi Girl Priyanka Chopra, on the income tax department's radar, read what is the episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.