होय आपल्या देसी गर्लने चक्क हॉलिवुडमधील तिच्या सहकारी कलाकारांना होळीच्या रंगात ...
देसी गर्लने रंगवीले हॉलिवुड कलाकारांना
/> होय आपल्या देसी गर्लने चक्क हॉलिवुडमधील तिच्या सहकारी कलाकारांना होळीच्या रंगात रंगवून टाकले आहे. बॉलीवुडमध्ये खेळली जाणारी दमदार होली तर सर्वांनाच माहित आहे. परंतू आपली ही देसी गर्ल आता हॉलिवुडमध्ये कामात व्यस्त असल्याने ती सध्या भारतातील होळी मिस करीत असुन आपली रंग खेळायची हौस तीने परदेशी मित्रांसोबत पुर्ण केली आहे. त्याचे झाले असे की, क्वांटिकोच्या सेटवर प्रियांकाने रंगांची उधळण करुन तिच्या क्वांटिको फॅमिलीला थँक्यु म्हटले आहे. घरापासुन दुर राहुन देखील तिच्या कलाकारांनी परदेशात तिच्यासाठी हा सण साजरा केल्याने ती सर्वांचे आभार मानत आहे. बॉलीवुडची ब्युटिक्वीन प्रियांका चोप्रा सातासमुद्रापार जाऊन आता आपल़्या अभिनयाने जगभरातील तिच्या चाहत्यांना घायाळ करीत आहे. क्वांटिको या सिरियल मध्ये ती दर्जेदार भुमिका साकारत असुन तिच्या कामाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. आता पहा ना ही आपली देसी गर्ल पुर्णपण रंगात हरवुन गेली आहे कि ओळखु देखील येत नाही म्हणुनच तर ती सर्वांना विचारत आहे पटकन गेस करा की मी कुठे आहे, विच वन इज मी.