सौंदर्यवतीचा ताज मिळविणाऱ्या दीया मिर्झाला ‘या’ तरुणाने दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:02 IST2017-10-03T11:25:09+5:302017-10-03T17:02:11+5:30

अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित बायोपिकमधून अभिनेत्री दीया मिर्झा कमबॅक करीत आहे. दीयाने २०१४ मध्ये प्रियकर साहिल याच्याशी ...

Deeway Mirza gets beauty award for 'beauty' | सौंदर्यवतीचा ताज मिळविणाऱ्या दीया मिर्झाला ‘या’ तरुणाने दिला नकार!

सौंदर्यवतीचा ताज मिळविणाऱ्या दीया मिर्झाला ‘या’ तरुणाने दिला नकार!

िनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित बायोपिकमधून अभिनेत्री दीया मिर्झा कमबॅक करीत आहे. दीयाने २०१४ मध्ये प्रियकर साहिल याच्याशी विवाह केल्यानंतर ती बॉलिवूडमधून जणूकाही गायबच झाली होती. आता ती पुन्हा एकदा कमबॅक करीत आहे. दरम्यान, दीयाने २००० या सालात मिस एशिया पॅसेफिकचा किताब पटकावला होता. याच वर्षी प्रियंका चोपडाला मिस वर्ल्ड तर लारा दत्ताला मिस युनिव्हर्स म्हणून घोषित केले होते. दीयाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात प्रेक्षकांनी तिला खूप पसंत केले. शिवाय आजही दीया मिर्झाच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, एक व्यक्ती अशीही आहे जिने दीयाला रिजेक्ट केले आहे. होय, दीयानेच एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. जेव्हा ती हैदराबाद येथे होती तेव्हा तिचे एका तरुणावर प्रेम जडले होते. ती त्याच्या आठवणीने व्यथित व्हायची, परंतु त्याने तिचा स्वीकार केला नाही. 

एक दिवस जेव्हा दीयाने त्या तरुणाला तिच्या मनातील त्याच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्याने तिला रिजेक्ट केले. यामुळे दीयाला खूपच धक्का बसला. ती बरेच दिवस डिप्रेस होती. दीयाने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी शाळेत होती तेव्हा माझे आणि माझ्या मैत्रिणीचे एका मुलावर प्रेम जडले होते. तोदेखील आम्हा दोघींवरही प्रेम करायचा. त्याने आमच्यापैकी एकीवरच प्रेम करावे, असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे मी त्याला माझ्या मनातील भावना सांगितली. परंतु त्याने मला स्पष्ट शब्दात नकार दिला. पुढे हे प्रकरण एवढे वाढले की, थेट प्रिन्सिपलपर्यंत पोहोचले. 

पुढे माझ्या आई-वडिलांनी त्याच्यापासून दूर राहण्याचा मला सल्ला दिला. परंतु मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले होते. त्यामुळे त्याला विसरणे मला अवघड होते. काही काळानंतर मी या प्रकरणातून सावरले. आज जेव्हा मला त्या दिवसांची आठवण येते तेव्हा असे वाटते की, जे झाले ते चांगलेच झाले. असो, सध्या दीया संजूबाबाच्या बायोपिकमध्ये काम करीत असून, त्यात ती संजय दत्तच्या आईची भूमिका साकारणार असल्याचे समजते. दीयासोबत संजूबाबाच्या भूमिकेत रणबीर कपूर झळकणार आहे. 

Web Title: Deeway Mirza gets beauty award for 'beauty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.