दीपिका रचणार एक इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 14:16 IST2016-10-16T14:16:41+5:302016-10-16T14:16:41+5:30
दीपिका पादुकोण ‘ xXx: Return Of Xander Cage’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करतेयं आणि या डेब्युसोबतच आत्तापर्यंत कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रीने ...

दीपिका रचणार एक इतिहास!
द पिका पादुकोण ‘ xXx: Return Of Xander Cage’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करतेयं आणि या डेब्युसोबतच आत्तापर्यंत कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रीने केले नाही,असे काहीसे ती करून दाखवणार आहे. होय, या हॉलिवूडपटाच्या इंडियन वर्जनमध्ये पूर्णपणे दीपिकाचा ‘जलवा’ दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दिसणाºया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केवळ दीपिकावर फोकस करण्यात आला आहे. हा ट्रेलर केवळ ‘दीपिका ओरिएंटेड’ असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकंदर काय, तर भारतात प्रथमच एक मेगा हॉलिवूड अॅक्शनपट कुण्या हॉलिवूड स्टारऐवजी बॉलिवूड कलाकाराच्या नावावर प्रमोट केला जाणार आहे. दीपिकाच्या स्टारडममुळे हे शक्य झाले आहे. या हॉलिवूडपटात अॅक्शनस्टार विन डिजेल लीड रोलमध्ये आहे. संपूर्ण जगभरात त्याचे असंख्य चाहते आहे. पण भारतात कदाचित विन डिजेलवर दीपिका भारी पडलीय. होय ना?