दीपिका -रणवीरची जोडी तुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:38 IST2016-10-17T11:38:50+5:302016-10-17T11:38:50+5:30
दीपिका पादुकोण व रणवीर कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चर्चेवर विश्वास ठेवाल तर, दोघांचेही नाते तुटण्याच्या स्थितीपर्यंत ...

दीपिका -रणवीरची जोडी तुटणार?
द पिका पादुकोण व रणवीर कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चर्चेवर विश्वास ठेवाल तर, दोघांचेही नाते तुटण्याच्या स्थितीपर्यंत येऊन ठेपले आहे. या नात्यातून बाहेर पडण्याची दोघांनीही मानसिक तयारी केली आहे. यापूर्वीही रणवीर व दीपिकाच्या ब्रेकअपची बातमी आली होती. मात्र त्यावेळी ती बातमी दडवली गेली. पण आता पुन्हा एकदा दोघांच्याही ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोघांमधील वैचारिक मतभेदांची दरी वाढली आहे. दीपिका आपल्याला कुठलेच महत्त्व देत नाही, असे रणवीरचे मत आहे. दीपिका या रिलेशनशिपबद्दल उत्साहित नाही. तिचे सगळे लक्ष तिच्या करिअरवर आहे, या विचाराने रणवीर हैरान आहे. रणवीर प्रचंड ऊर्जाशील व्यक्तिमत्त्व आहे. अनेक व्यासपीठांवरून त्याने दीपिकावरचे प्रेम जाहिरपणे व्यक्त केले आहे. मात्र दीपिका अद्यापही याबद्दल सोयीस्कर मौन बाळगून आहे. तिने एकदाही रणवीरच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली नाही. यामुळे रणवीर नाराज आहे. अलीकडे रणवीर व वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’चे ट्रेलर लॉन्च झाले. पॅरिसच्या आयफेल टॉवर हा सोहळा झाला. ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण दीपिकाने याबद्दल साधी एक प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. या सगळ्या गोष्टी रणवीरला त्रासदायक वाटू लागल्या आहे. लवकरच दीपिका व रणवीर ‘पद्मावती’चे एकत्र शूटींग सुरु करणार आहेत. कदाचित त्यावेळी दोघांमधील तणाव मावळून पुन्हा हे कपल एकत्र येईल. कारण दोघांच्याही चाहत्यांची आणि आमचीही हीच इच्छा आहे.