‘पद्मावत’च्या यशानंतर दीपिका पादुकोणचे ‘fun mode’ फोटोशूट! तुम्हीही पाहा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 15:35 IST2018-02-01T10:05:24+5:302018-02-01T15:35:58+5:30
दीपिका पादुकोण सध्या जाम खूश आहे. साहजिकचं याचे कारण आहे, तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पद्मावत’ हा चित्रपट. ‘पद्मावत’वरून अनेक ...

‘पद्मावत’च्या यशानंतर दीपिका पादुकोणचे ‘fun mode’ फोटोशूट! तुम्हीही पाहा!!
द पिका पादुकोण सध्या जाम खूश आहे. साहजिकचं याचे कारण आहे, तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पद्मावत’ हा चित्रपट. ‘पद्मावत’वरून अनेक वाद झालेत. आंदोलने झालीत. दीपिकाला नाक कापण्याची धमकीही मिळाली. पण याऊपरही हा चित्रपट रिलीज झाला आणि विशेष म्हणजे, प्रेक्षकांच्या पसंतीत उरतला. रिलीजनंतरच्या केवळ पाचचं दिवसांत ‘पद्मावत’ने शंभर कोटींचा गल्ला गाठला आणि आता तर या चित्रपटाची २०० कोटींकडे वाटचाल सुरू आहे. आता इतके अपार यश म्हटल्यावर डिप्पी तर खूश असणारच. हा आनंद तिच्या ताज्या फोटोशूटमध्येही तुम्ही बघू शकाल. अलीकडे दीपिकाने ‘वोग’ मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटची थीमचं मुळात ब्रार्ईट आणि हॅपी होती. मग काय, दीपिकाने या थीमवर असे काही हास्य पेरले की, चाहतेही खूश झालेत.
![]()
![]()
या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील दीपिकाच्या ओठांवरचे हसू पाहतचं राहावेसे वाटते. यापूर्वी दीपिका कुठल्याही फोटोशूटमध्ये इतकी खळखळून हसली नाही. पण या फोटोशूटची बातचं न्यारी. त्यामुळेच फन अन् लव्हिंग दीपिकाला हा अंदाज लोकांना जाम आवडलाय. तिचे हे फोटो लोकांना कमालीचे आवडले आहेत.
![]()
![]()
ALSO READ : स्वरा भास्करच्या खुल्या पत्रावर दीपिका पादुकोणने दिले असे उत्तर!
‘पद्मावत’च्या रिलीजनंतर दीपिका सध्या मीडियात मुलाखती देतांना दिसतेय. चित्रपटाशी संबंधित अनेक खुलासे तिने केले आहेत. ‘जौहर’चा सीन माझ्यासाठी सगळ्यात कठीण सीन होता, असे तिने सांगितले.
![]()
भविष्यातही तू ‘पद्मावत’सारखे चित्रपट करणार का? असा प्रश्न तिला अलीकडे एका इव्हेंटमध्ये केला गेला. यावर ‘इतना सब होने के बाद कभी नहीं,’ असे उत्तर दीपिकाने दिले. करणी सेनेच्या धमक्या आणि विरोधानंतर मी स्वत:ला सांभाळू शकते, याची माझ्या पालकांना पूर्ण खात्री होती. योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक त्यांनी आम्हा दोघी बहिणींना शिकवला आहे. सत्यासोबत खंबीरपणे उभे राहायचे त्यांनी आम्हाला शिकवलेय. मी तेच केले, असेही तिने यावेळी सांगितले.